Whale Fish Video: प्राण्यांच्या रेस्क्यूचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पण, हे रेस्क्यू छोट्या प्राण्याचे नसून, एका अवाढव्य व्हेल माशाचे आहे. समुद्र किनाऱ्यावर अडकलेल्या माशाला तब्बल 20 तासानंतर समुद्रात सोडण्यात यश आले. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ चीनच्या झेजियांग प्रांतातील जिंजियांग शहराचा आहे.
पहा व्हिडिओ:-
20 तास चालले बचावकार्य तब्बल 60 टन वजनाचा हा महाकाय व्हेल मासा चीनच्या शिनजियांगच्या समुद्रकिनाऱ्यावर अडकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तो लाटांसोबत किनाऱ्यावर आल्याचा अंदाज आहे. त्या माशाला वाचवण्यासाठी अनेक लोक येतात आणि सतत त्याच्या अंगावर पाणी टाकतात. काही वेळानंतर व्हेलला वाचवण्याची प्रक्रिया सुरू होते. 20 तासांच्या अथक परिश्रमानंतर रेस्क्यू टीम त्या माशाला समुद्रात सोडते. गायब होणारी व्हेलसमुद्राच्या उथळ पातळीमुळे व्हेल अनेकदा समुद्रकिनाऱ्यावर येतात. जगात अनेक ठिकाणी व्हेल मासा किनाऱ्यावर आल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील अनेक मासे मरतात, पण काहींना वाचवण्यात यश येते. अशा महाकाय माशांचे रेस्क्यू खूप अवघड असते. चीनच्या किनारपट्टीवर आलेला हा मासा 60 टन वजनाचा स्पर्म व्हेल होता. मोठ्या प्रयत्नानंतर त्याला वाचवण्यात यश आले.