शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

१००० वर्षांपेक्षा अधिक जगणारी जिन्कगो झाडे!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 3:46 AM

डायनासोर नष्ट होण्यापासून ते हिरोशिमावरच्या अणुहल्ल्यापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तीतून ही झाडे जगली आहेत.

जिन्कगो ही जगातील सर्वात प्राचीन वृक्ष प्रजाती आहे. जवळजवळ २०० दशलक्ष वर्षांपासून या ग्रहावर आहे. एकच जिन्कगो वृक्ष शेकडो वर्षे जगतो. कदाचित, हजारांहून अधिक वर्षे. डायनासोर नष्ट होण्यापासून ते हिरोशिमावरच्या अणुहल्ल्यापर्यंतच्या सर्वात मोठ्या आपत्तीतून ही झाडे जगली आहेत.त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय?चीनमधील जिन्कगो बिलोबाच्या झाडांवरच्या फांद्यांवरची वर्तुळे आणि जीन्सच्या अवलोकनानुसार काही वृक्ष १,००० वर्षांपेक्षा जास्त जुने असल्याचे पुढे आले आहे. उत्तर टेक्सास विद्यापीठातील जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डिक्सन म्हणाले की, मानवांमध्ये जसे जसे वय वाढते, तशी रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहू शकत नाही. मात्र, ही झाडे १,००० वर्षे जुनी असली, तरी त्यांची रोगप्रतिकारशक्ती भरपूर आहे. त्यामुळे झाडे २० वर्षांची वाटतात.जनुकांमध्ये मृत्यूचा कार्यक्रम नाहीरिचर्ड डिक्सन यांच्या चीन आणि अमेरिकेतील सहकाऱ्यांनी तरुण आणि वृद्ध जिन्कगोच्या झाडांची तुलना केली. ‘प्रोसेसिंग आॅफ नॅशनल अकॅडमी आॅफ सायन्स’ हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. झाडाच्या सालीमागील जिवंत पेशींचा थर ‘व्हॅस्क्युलर कॅम्बियम’ची आनुवंशिक तपासणी केल्यानंतरआढळले की, जिन्कगो वृद्धापकाळातही अमर्याद वाढते. हे ‘कॅम्बियम’ व जनुकांमध्ये संवेदना किंवा मृत्यूचा कोणताही कार्यक्रम नसतो.पानेही तितकीच तरतरीतशेकडो वर्षांनंतरही त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी आपला जीवनक्रम सुरू ठेवला आहे. जुनी झाडेदेखील बरेच बियाणे तयार करतात. त्यांची पाने तरुण झाडांइतकीच संपन्न असतात. कॅलिफोर्नियातील ‘मेथुसेलाह’ म्हणून ओळखल्या जाणाºया ८०० वर्षांच्या ‘ब्रिस्टलॉन’ झाडाचा आनुवंशकीय कार्यक्रमसुद्धा असाच असू शकेल, असे शास्त्रज्ञांना वाटते. मात्र, अद्याप याची चिकित्सा होणे बाकी आहे.झाडेही वृद्ध होतात पण...जरी जिन्कोगो दीर्घ आयुष्य जगतात, तरीही ती वृद्ध होतातच, पण खोडात असलेले कॅम्बियम अखंड आणि सक्रिय राहते. कधी-कधी झाडे फक्त पोकळ ओंडक्यासारखी होतात, परंतु ‘कॅम्बियम’ अखंड असल्याने ती पाने आणि फुले तयार करतात किंवा पेंढा म्हणून जगू शकतात. ही झाडे पूर्णपणे मरतात का, याचा अभ्यास सुरूच आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेforestजंगल