आजकाल लोकांना फोनची किती सवय लागली आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. सतत फोनवर बोलणं किंवा सोशल मीडिया बघणं हे आता रोजचं कामच झालं आहे. बऱ्याचदा लोक फोनवर बोलता बोलता इतके हरवून जातात की, त्यांना कशाचं भानही नसतं. फोनवर बोलता बोलता लोक नकळत अनेक गोष्टी करतात. केरळमधील एक तरूणीही अशीच फोनवर बोलण्यात हरवून गेली होती. तेव्हा तिने एक फूल तोडलं आणि खाल्लं ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
एखाद्या फुलामुळे कुणाचा जीव जाऊ शकतो याचा कुणी विचारही करत नाही. पण या तरूणीसोबत तेच झालं. या फुलाचं नाव अरली (Oleander) असं आहे. न्यू इंडियन एक्सप्रेस न्यूज वेबसाइटनुसार, 24 वर्षीय सूर्या सुरेंदरन केरळच्या अलापुझा जिल्ह्यात राहणारी होती. ब्रिटनमध्ये तिला नर्स म्हणून नोकरी मिळाली होती. तिथे जाण्यासाठी ती रविवारी कोच्ची एअरपोर्टवर पोहोचली होती. पण तेव्हाच ती अचानक बेशुद्ध झाली.
अंगमाली शहरातील एका हॉस्पिटलमध्ये तिला लगेच दाखल करण्यात आलं.पण सोमवारी तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनुसार, अरलीची फुलं खाल्ल्याने तिचं निधन झालं. हॉस्पिटलमध्ये दाखल करताना तिच्या परिवाराने सांगितलं होतं की, रविवारी सकाळी ती घरीच होती. सकाळी ती गार्डनमध्ये होती आणि चुकून एका फुलाच्या पाकळ्या खाल्ल्या. तिला चूक केल्याची लगेच जाणीव झाली आणि फुलाच्या पाकळ्या थुंकल्या. पण तोपर्यंत फुलाचा रस तिच्या पोटात गेला होता.
डॉक्टरांनी सांगितलं की, तिच्या रक्तात काही विषारी पदार्थ होते. डॉ. बेनिल कोटाक्कल म्हणाले की, या फुलामध्ये एल्कलॉइड असतात. जे थेट व्यक्तीच्या हृदयावर प्रभाव करतात.