अजब! होस्टेलच्या बाथरूममध्ये तरूणीने केलं असं काही, मागावी लागली लेखी माफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 03:27 PM2023-06-09T15:27:55+5:302023-06-09T15:30:07+5:30

या घटनेबाबत एका रेडिट यूजरने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. अमल ज्योति कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला फोन परत मिळवण्यासाठी वार्डनला माफी मागावी लागली.

Girl get punished for listing music in bathroom she wrote later had to apologize | अजब! होस्टेलच्या बाथरूममध्ये तरूणीने केलं असं काही, मागावी लागली लेखी माफी!

अजब! होस्टेलच्या बाथरूममध्ये तरूणीने केलं असं काही, मागावी लागली लेखी माफी!

googlenewsNext

Kerala Student Apology Letter: एका तरूणीने बाथरूममध्ये असं काही केलं ज्याची तिला माफी मागावी लागली. केरळच्या एका इंजिनिअरींग कॉलेजमध्ये एका तरूणीचा फोन वार्डनने कथितपणे आंघोळ करताना म्युझिक ऐकण्याच्या कारणावरून जप्त केला होता. नंतर तिने माफी मागितली, पण त्याआधी वाद पेटला होता. या घटनेबाबत एका रेडिट यूजरने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं. अमल ज्योति कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला फोन परत मिळवण्यासाठी वार्डनला माफी मागावी लागली. रेडिट यूजर @bheemanreghu ने माफीनाम्याचा फोटोसोबत तरूणीचाही फोटो शेअर केला आहे.

तरूणीने लेटरमध्ये लिहिलं की, 'मी आंघोळ करत असताना माझ्या फोनमध्ये गाणी ऐकण्यासाठी माफी मागते आणि असं मी पुन्हा करणार नाही. मला माझा फोन परत द्यावा ही विनंती द्यावी. कारण मला महत्वाचं काम आहे आणि प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे'. हे लेटर गेल्या ऑक्टोबरमधील आहे. रेडिट पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'म्युझिक ऐकण्यासाठी एक माफी पत्र - अमल ज्योति कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'. एका यूजरने यावर ही तर हुकूमशाही अशी कमेंट केली आहे.

पोस्टवर वेगवेगळ्या कमेंट्स लोकांनी कमेंट्स केल्या जात आहेत. एकाने लिहिलं की, 'ही तर हुकूमशाही आहे. कुणी काय आंघोळ करताना गाणंही ऐकू शकत नाही. इतक्या छोट्या गोष्टीला इतकं मोठं करण्याची गरज नाही. केवळ सूचना देऊ शकले असते'. तर दुसऱ्याने लिहिलं की, 'तर फक्त म्युझिक ऐकत होते. यात काही चूक नाही. मला तर  रात्री 8 किंवा 9 वाजता शौचास जाण्यासाठी दंड भरावा लागत होता. कारण हा अभ्यासाचा वेळ होता'.

Web Title: Girl get punished for listing music in bathroom she wrote later had to apologize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.