मोकळेपणाने जांभई दिली तर तोंड किती उघडलं जातं हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण तेच जर जांभई दाबून ठेवली तर तोंड बंदच राहतं. पण एका तरूणीला बिनधास्तपणे जांभई देणं इतकं महागात पडलं ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. तरूणीने जांभई देण्यासाठी तोंड उघडलं, पण ते नंतर बंदच झालं नाही. शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. तरूणीने तिच्यासोबत घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओही रेकॉर्ड केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे.
तरूणीचं नाव जेना सिनातरा असून ती एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिने पोस्ट करून सांगितलं की, मला विश्वासच बसत नाहीये की, असंही होऊ शकतं. एका दुसऱ्या व्हिडीओत मिशिगनच्या एका प्लास्टिक सर्जन डॉ. एंथनी यून यांनी जेनाच्या जबड्यामध्ये निर्माण झालेल्या या स्थितीला 'ओपन लॉक' म्हटलं आहे. ज्यात जबडा उघडल्यावर बंदच होत नाही.
डॉक्टरांनी जेनाचा एक्स-रे काढला आणि जबडा पुन्हा बरोबर केला. डॉक्टर म्हणाले की, आम्ही तुझ्या मांसपेशींना थोडा आराम देणार आहोत आणि नंतर ते पुन्हा आधीसारखं करू. त्यांनी सांगितलं की, जेनाने जांभई देण्यात इतकी घाई केली की, तिचा जबडा जागेवरून सरकला आणि ज्या स्थितीत होता तसाच उघडा राहिला.आपल्या स्थितीबाबत जेनाने अपडेट दिली. तिने एक व्हिडीओ पोस्ट करून कॅप्शनला लिहिलं की, खूपसाऱ्या औषधांनंतर चार डॉक्टरांनी माझा जबडा बरोबर केला.
व्हिडीओत ती चेहऱ्यावर बॅंडेज लावलेली दिसत आहे. जेनाच्या स्थितीबाबत डॉक्टरांनी सांगितलं की, हे फार दुर्मिळ आहे. पण जेव्हाही असं होतं तेव्हा ते जांभई देताना होतं. याचं एक मुख्य कारण म्हणजे जबडा आपल्या जागेवरून सरकणं आहे. ही समस्या सामान्य उपचार केल्यावर दूर होते.