इंग्लंडच्या (England) एका महिलेने तिच्या घरात ४५ मांजरी पाळल्या होत्या. जेव्हा या मांजरींचं पोट भरणं अवघड झालं तेव्हा या महिलेने एक असं काम सुरू केलं ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यानंतर महिला महिन्याला लाखो रूपये कमाई करू लागली. या पैशातून ती आता मांजरींचं पोट भरण्यासोबतच आलिशान जीवन जगत आहे.
कॅट इंग्लिश (Cat English) नावाची ही महिला इंग्लंडच्या ईस्ट लॅकशायरमध्ये राहते. ती एक एस्कॉर्ट म्हणून काम करते. १८ वयाची असताना तिने लॅप डान्सर म्हणून काम सुरू केलं होतं. या दरम्यान ती हेल्थ केअरची शिक्षण घेत होती. त्यासोबतच ती बारमध्ये लॅप डान्सर म्हणून काम करून पैसे कमावत होती आणि त्यातून मांजरींचं पोट भरत होती.
'द सन' च्या वृत्तानुसार, ती रस्त्यावर राहणाऱ्या मांजरींना नेहमीच जेवण देत होती. कारण तिला वाटत होतं की, मांजरी उपाशी आहेत. कॅटनुसार, अनेकदा एस्कॉर्टचं काम करून ती एका रात्रीत १ लाख रूपये कमावत होती. यातील जास्तीत जास्त पैसे ती मांजरींवर खर्च करत होती. तिच्या वडिलांवरही कर्ज होतं. जेव्हा हे कर्ज फेडलं तेव्हा तिने हे काम करणं बंद केलं होतं. यानंतरही मांजरींना जेवण देणं सुरू ठेवलं होतं.
यानंतर कॅटने रीटेल बिझनेस सुरू केला. ती सांगते की, सुरूवातीला यातून कमी पैसे मिळाले. त्यामुळे तिने एस्कॉर्ट बनण्याचा विचार केला. मग ती ऑस्ट्रेलियात गेली. इथे तिने अॅडल्ट इंडस्ट्रीत काम सुरू ठेवलं आणि यातू मिळणाऱ्या पैशातून ती मांजरींची काळजी घेऊ लागली. ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत राहते. आता तिला अजून जास्त मांजरी पाळायच्या आहेत.