6 वर्षापर्यंत एक मुलगी मुलगा बनून राहिली. यादरम्यान तिच्यासोबत राहत असलेल्या मुलांनाही हे समजलं नाही. ही मुलगी मुलांसारखे कपडे घालत होती, त्यांच्यासारखीच सगळं काही करत होती. इतकंच काय तर तिने तिचं नावही मुलांसारखं ठेवलं होतं. केनियामध्ये राहणाऱ्या मुलीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. केनियाच्या नायवासामध्ये राहणारी मेरी कोनसोलोटा वंगोई जेव्हा 10 वर्षांची झाली तेव्हा तिने तिचं नाव बदलून जिमी ठेवलं.
मेरीने सांगितलं की, 'परिवारात पाच बहिणी होत्या. वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा आई प्रेग्नंट होती. तेव्हाच तिच्या एका बहिणीने शाळा सोडली आणि एका घरात घरकाम करत होती. जेणेकरून घर खर्च चालावा. आई प्रेग्नंट होती त्यामुळे ती काम करू शकत नव्हती'. अशात मेरीने स्वत: काम करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ती नैरोबीला आली.
नैरोबीला आल्यावर मेरीला जाणवलं की, इथे मुली सेफ नाहीयेत. तेव्हाच 10 वर्षांची झाल्यावर तिने तिचं नाव बदलून जिमी ठेवलं आणि ती मुलांसारखी राहू लागली होती.
मेरीने सांगितलं की, जिमी बनून ती मुलांसारखी राहत होती. त्यांच्यासोबतच वेळ घालवत होती. मुलांसोबत राहून तिला ड्रग्सची सवय लागली होती. ती मुलांच्या रूममध्येच राहत होती. पण कुणालाही ती मुलगी असल्याचा अंदाज आला नाही.
मेरी म्हणाली की, तिचं वागणं पूर्णपणे मुलांसारखं होतं. अशात तिला ओळखणं सगळ्यांसाठीच अवघड झालं होतं. नैरोबीला आल्यावर अडचण तर आली, पण लोक रस्त्यावर राहत असताना तिला काहीना काही खायला देत होते.
मेरी म्हणाली की, ती आता वयात येत होती. यादरम्यान तिच्या शरीरात बदल होत होता. अशात ती तिचे स्तन लपवून ठेवत होती. जेणेकरून तिचा भांडाफोड होऊ नये. पण तिचा हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर तिने तिच्या गावी नायवासा परत जाण्याचा निर्णय घेतला. गावात गेल्यावर तिने तिचं नाव बदलून कोनी ठेवलं. तिथे काही राहिल्यावर ती पुन्हा नैरोबीला आली.
नैरोबीला परत आल्यावर मेरी म्हणजेच जिमीच्या मित्रांनी तिला वाचारलं की, तू खोटी का बोललीस? तेव्हा सत्य जाणून घेतल्यावर तेही हैराण झाले.मेरी म्हणाली की, तिच्यासोबत एकदा गॅंगरेप झाला होता. 16 वयात ती प्रेग्नंट झाली होती. यानंतर मेरीने पुन्हा गावी जाण्याचा निर्णय घेतला. ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिचा खर्च एका सीनिअर मॅनेजरच्या बहिणीने केला. जेव्हा तो तिच्या घरी गेला तेव्हा तिची गरिबी बघून तोही हैराण झाला. कारण त्यांच्याकडे झोपण्यासाठीही चादर नव्हती. मग या व्यक्तीने तिची मदत केली.