नवी दिल्ली : अवघ्या 10 वर्षांची मुलगी आपल्या खेळण्यांच्या व्यवसायातून एवढी कमाई करते की, ती वयाच्या 15 व्या वर्षीही आरामात रिटायरमेंट घेऊ शकते. दरम्यान, पिक्सी कर्टिस नावाच्या या मुलीला तिचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तिची आई रॉक्सी यांनी खूप मदत केली आहे. विशेष म्हणजे पिक्सीने गेल्या एका महिन्यातच एक कोटी 4 लाख रुपयांहून अधिक कमाई केली आहे.
'मिरर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियात राहणारी पिक्सी तिच्या आईसोबत फिजेट्स आणि रंगीबेरंगी पॉपिंग खेळणी बनवते. या खेळण्यांना मागणी एवढी आहे की, ती बाजारात लगेच विकली जात आहेत. याशिवाय, पिक्सीच्या नावावर एक हेअर ऍक्सेसरी ब्रँड देखील आहे, जो तिची आई रॉक्सी यांनी स्वतः बनवला आहे. यात अतिशय स्टाइलिश आणि सुंदर हेडबँड, क्लिप आणि इतर साहित्यांचा समावेश आहे.
पिक्सीची आई रॉक्सी यांनी एका मुलाखतीत सांगितले, "माझ्यासाठी सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे माझ्या मुलीमध्ये एवढ्या लहान वयात असलेली उद्योजकता आहे. तर ही प्रतिभा माझ्यात कधीच नव्हती. मलाही यशस्वी व्हायचे होते. पण माझ्या मुलीने इतक्या कमी वयात व्यवसाय यशस्वी करून माझे स्वप्न पूर्ण केले आहे."
ज्यावेळी मी स्वतः 14 वर्षांची होती, त्यावेळी ती मॅकडोनाल्डमध्ये काम करत होती. एखादा पगारदार माणूस जेवढे कमवू शकतो तेवढीच कमाई करत होती, असे रॉक्सी म्हणाल्या. तसेच, माझ्या मुलीमुळेच मला उद्योजक बनण्याची संधी मिळाली. माझ्या मुलीला एवढ्या लहान वयात ते सगळं मिळालं ही आनंदाची गोष्ट आहे, जी मला आता मिळत आहे. आम्ही पिक्सीसाठी सर्व नियोजन केले आहे, जेणेकरून ती वयाच्या 15 व्या वर्षी रिटायरमेंट घेऊ शकेल, असेही रॉक्सी यांनी सांगितले.
दरम्यान, पिक्सी सध्या सिडनीतील एका प्राथमिक शाळेत शिकत आहे. पण या वयातही पिक्सी आणि तिच्या भावाकडे एक कोटी 40 लाख रुपयांची मर्सिडीज कार आहे. रॉक्सी यांनी सांगितले की, सिडनीमध्ये त्या आपली मुले आणि पती ऑलिव्हर कर्टिससह 49.72 दशलक्ष रुपयांच्या हवेलीत राहतात. 2012 मध्ये त्यांचे ऑलिव्हरसोबत लग्न झाले होते. रॉक्सी यांचे अनेक यशस्वी व्यवसाय आहेत.