Realtionship : सहा वर्ष एका तरूणाला डेट केल्यानंतर एका तरूणीला असं सत्य समजलं ज्यामुळे ती हैराण झाली. तरूणीचा बॉयफ्रेन्ड तिचा भाऊ निघाला. तरूणी तिच्या एका रेडीट पोस्टमध्ये याबाबत डिटेलमध्ये सांगितलं आहे.
तरूणीने लिहिलं की, मला नुकतंच समजलं की, मी ज्या मुलाला 6 वर्षांपासून डेट करत आहे. तो माझा बायोलॉजिकल भाऊ आहे. मी 30 वर्षांची आहे आणि माझा भाऊ 32 वर्षांचा आहे. आता मला फारच विचित्र वाटत आहे.
तरूणीने सांगितलं की, बालपणी तिला दत्तक घेण्यात आलं होतं. मला याची माहिती हाय स्कूलमध्ये गेल्यावर मिळाली. तरूणीला तिच्या बॉयफ्रेन्डने सांगितलं की, त्याला सुद्धा दत्तक घेण्यात आलं होतं. त्यामुळेच दोघे जवळ आले. ती म्हणाली की, आम्हा दोघांनाही हाय स्कूलमध्ये गेल्यावर त्यांच्या दत्तक घेण्याबाबत समजलं. आम्ही नशीबवान होतो की, आम्हाला चांगली फॅमिली मिळाली.
तरूणीने पोस्टमध्ये सांगितलं की, याआधी इतक्या लवकर ती कुणाच्याही जवळ आली नव्हती. आता तरूणीला वाटतं की, भाऊ असल्याने ती तरूणासोबत जास्त कन्फर्टेबल होती. त्यांनी सांगितलं की, दोघांनी सोबत अॅनिव्हर्सरी साजरी केली आणि एकमेकांना I Love You म्हणत राहिले.
तरूणीने सांगितलं की, DNA टेस्टच्या माध्यमातून तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेन्डच्या खऱ्या नात्याबाबत तिला माहिती मिळाली. ते म्हणाले की, त्यांना खऱ्या आई-वडिलांबाबत जाणून घ्यायचं आहे. पण त्याआधीच आम्हा दोघा भाऊ-बहिणीच्या नात्याचा खुलासा झाला. मी हैराण झाले. मी आतापर्यंत याबाबत बॉयफ्रेन्डला सांगितलं नाही.
आता तरूणीला आशा आहे की, ही टेस्ट चुकीची ठरावी. ते दोघे लवकरच दुसरी टेस्ट करणार आहेत. तरूणीच्या या पोस्टवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, जगात 700 कोटी लोक आहेत. काय अडचण आहे. दुसऱ्याने लिहिलं की, यात दोघांची चूक नाहीये, पण दोघे आता एकत्र राहू शकणार नाहीत.