TikTok Girl, Short Dress: जगात कुठे काय घडेल याचा अंदाज बांधणं हल्ली जरा कठीणच झालंय. कारण खरं पाहता, कोणी काय कपडे घालायचे हे ठरवण्याचा ज्याचा त्याला अधिकार आहे. किमान पाश्चिमात्य देशांमध्ये तरी कपडे घालण्यावर कोणतेही बंधन नाहीत. पण अमेरिकेच्या एका शहरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली. अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशात एखाद्या महिलेने किंवा मुलीने शॉर्ट स्कर्ट किंवा तुलनेने छोटे कपडे घातले तर त्याचं फारसं नवल वाटून घेतलं जात नाही. पण एक टिकटॉक स्टार मुलीने तोकडे कपडे घातल्यामुळे तिच्या शेजाऱ्यांनी जे काही केलं तर खरंच थक्क करणारं होतं. तरुणीनेदेखील या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो टिकटॉकवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या खूप शेअर केले जात असून व्हायरलही झाला आहे.
शेजाऱ्यांनी नक्की काय केलं?
रिपोर्टनुसार, टिकटॉकर मुलगी म्हणाली की ती अनेकदा असेच कपडे घालते आणि व्हिडिओ रेकॉर्ड करते. मात्र अलीकडेच तिच्या शेजाऱ्यांनी याबाबत गोंधळ घातला. त्यांनी त्या मुलीच्या कपड्यांबाबत थेट पोलिसांकडे तक्रार केली. पोलिस आले आणि त्यांनी मुलीला सांगितलं की तिच्या कपड्यांबाबत पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्यामुळे पोलिसांनी तिला कपडे बदलण्यास सांगितले. ती टिकटॉकर मुलगी खूपच तोकडे कपडे घालते आणि अंगप्रदर्शन करते, असे म्हणत शेजाऱ्यांनी मुलीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला होता. टिकटॉकरने व्हिडिओमध्ये ट्यूब टॉप, डेनिम शॉर्ट आणि बूट घातले होते.
शेजार्यांप्रमाणे पोलिसांनीही मुलीला कपड्यांवरून सुनावलं...
टिकटॉकवर @1mperatix नावाच्या या युजरने सांगितले की शेजाऱ्यांना तिचा ड्रेस आवडला नाही. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन करून सांगितले की, शॉर्ट ड्रेस घालून मी अंगप्रदर्शन करते. त्यानंतर पोलिसांनीही तिना समजावून सांगण्यास सुरुवात केली. पण त्याचा या टिकटॉकरला राग आला. 'चांगलं आणि सुंदर दिसण्यासाठी तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे', असं तिने ठामपणे पोलिसांनाही सांगितले. तसेच, 'मी अशीच राहीन. मी चांगले कपडे घातले आहेत. ही माझी शैली आहे. त्यांना शैली आवडली नाही तरी मी असेच करत राहिन', असेही ती मुलगी म्हणाली.