ऑनलाइन मैत्री अन् डेटिंग किती जोखमीचं असू शकतं याचं एक ताजं उदाहरण समोर आलं आहे. इंडियाना इथं राहणाऱ्या एका मुलीची टेक्सास इथल्या युवकासोबत ऑनलाइन मैत्री झाली. या ऑनलाइन मैत्रीचं रुपांतर हळूहळू प्रेमात झालं. दोघेही रिलेशनशिपमध्ये आले, त्यानंतर दोघांनीही एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. मुलगी मुलाला भेटण्यासाठी त्याच्या शहरात गेली परंतु एअरपोर्टवर उतरताच तिच्यासोबत जे घडलं त्याने तिला मोठा धक्का बसला.
जैस्मीन आणि जमाल असं या दोघांचं नाव आहे. जमालनं जैस्मीनला त्याच्या शहरात डेटला येण्यासाठी विचारलं होते. त्यानंतर जैस्मीननं बॅग भरली आणि जमालला भेटायला निघाली. जवळपास ३१ हजार खर्च करून जैस्मीन इंडियाना ते टेक्सास या २४०० किमी प्रवासासाठी फ्लाईट पकडली. परंतु तिचा हा प्रवास आयुष्याला वेगळ्याच वळणावर घेऊन येणारा ठरेल याची कल्पनाही तिने केली नव्हती. लवकरच तिच्या ऑनलाइन प्रेमाचा भंग होणार याची जाणीव तिला नव्हती.
रिपोर्टनुसार, जैस्मीन जमालला भेटण्यासाठी प्रचंड उत्सुक होती. २४०० किमी प्रवास करत जैस्मीन जेव्हा टेक्सास एअरपोर्टला उतरली तेव्हा तिने तिचा फोन सुरू केला. मात्र जमालनं तिला ब्लॉक केल्याचं दिसून आले. जमाल जैस्मीनला नेण्यासाठी एअरपोर्टला आला नाही. तिच्या कुठल्याही मेसेज आणि कॉललाही जमालनं उत्तर दिलं नाही. जमालनं जैस्मीनचा विश्वासघात केला होता. तुला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे, तु लवकर ये, तुझी वाट पाहतोय असं जमाल जैस्मीनला बोलला होता. परंतु जैस्मीन टेक्सासला पोहचली तेव्हा जमाल तिथे आलाच नाही.
दरम्यान, टेक्सासला पोहचल्यानंतर घडलेल्या प्रकारामुळे जैस्मीन घाबरली होती. खूप वेळ ती एअरपोर्टवरच जमालची वाट पाहत बसली. परंतु तो आलाच नाही. सुदैवाने टेक्सासमध्ये जैस्मीनची मैत्रिण राहत होती त्यामुळे जैस्मीन तिच्या घरी गेली. मैत्रिणीला भेटल्यानंतर जैस्मीननं घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर अनेकदा जमालला कॉल आणि मेसेज करण्याचा प्रयत्न जैस्मीननं केला मात्र त्याच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. सध्या जैस्मीन टेक्सासला आहे की, इंडियानाला परत गेली याबाबत माहिती मिळाली नसल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.