सगळया जगाला माहीत आहे की ड्रग्सचा धंदा करत असलेल्या लोकांचे खूप मोठे नेटवर्क असते. पोलीसांच्या जाळ्यात अडकू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग ते करत असतात. तसचं आपलं सामान नेहमी लपवून छपवून लोकांना चकवा देऊन विशिष्ट ठिकाणी पोहोचवत असतात.
बेकायदेशीरपणे घातक पदार्थ नेण्यासाठी ते लोक वेगवेगळे जुगाड करत असतात. शेविंग फोम पासून लहान मुलांची खेळणी किंवा साहीत्य या सगळयाचा वापर करत असतात. अशीच एक घटना घडली आहे. अमेरिकेतील एका आईने आपल्या मुलीला देण्यासाठी ख्रिसमससाठी बाहुली खरेदी केली. आपल्या मुलीला भेट म्हणून दिली. पण या बाहुलीमध्ये चक्क कोकेन सापडलं. एलिजाबेथ असं यांचे नाव आहे. ५०० डॉलर्सना ही बाहुली या महिलेले विकत घेतली होती.
माध्यमांनी दिले्ल्या वृत्तानसार जेव्हा ख्रिसमसच्या दिवशी मुलीने आणि आईने ही बाहुली पाहीली तर त्या आश्चर्यचकीत झाल्या. ही बाहुली एका कपड्यात लपटून ठेवली होती. नंतर त्या पोलीसात गेल्या तेव्हा त्यांना कळले की त्यात कोकेन आहे. पोलीस लगेचच त्याठिकाणी पोहोचले. पुढच्या तपासाला सुरूवात केली आहे.
https://www.facebook.com/elizabeth.faidley.7/videos/10102013365481285/