मिशिगन येथील एका ख्रिस्ती दांपत्याने आपल्या नवजात आजारी मुलीला कोणतेही उपचार न करता तसेच ठेवल्याची घटना समोर आली आहे. यातच त्या लहानगीचा मृत्यू झाला. देवाला जे अभिप्रेत असते ते होतेच, असे म्हणत त्यांनी डाॅक्टरांना आपल्या मुलीच्या आजारावर इलाज करु दिले नाहीत.
मिररच्या वृत्तानुसार, रशेल जॉय पायलंड (३०) आणि तिचा पती जोशुआ बॅरी पायलंड (३६) यांनी त्यांच्या अवघ्या तीन दिवसांच्या आजारी मुलीवर - ऍलीगेलला उपचार घेणे नाकारले. आणि त्यामुळे त्यातच तिचा मृत्यू झाला.
कावीळीने मरण पावलेल्या आपल्या नवजात बाळाविषयी हे ख्रिस्ती जोडपे म्हणाले की "देव कधीच कोणतीही चूक करीत नाही.’’ या जोडप्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासाठी त्यांना पंधरा वर्षांची शिक्षा सुनावली आली.
लान्सिंग जर्नलच्या वृत्तानूसार, फेब्रुवारीमध्ये मिशीगन येथे ऍलीगेलच्या जन्माच्यावेळी सुईण आणि तिच्या सहकारी महिलांनी बाळ सुदृढ असल्याचे तिच्या आई-वडिलांना सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी बाळाची तपासणी केली असता तिला काविळ झाल्याचे सुईणीला समजले. तिने तसे मुलीच्या आईला म्हणजे रशेलला सांगितले असता ती म्हणाली, ‘देव चूकत नाही. तो जे करतो ते योग्यच असतं. जवळपास निम्म्या नवजात बाळांचा त्वचा ही पिवळसर असते. त्यामुळे हे काळजी करण्यासारखे नाही. ’
खरंतर नवजात बाळांच्या त्वचेचे नाजूकपणामुळे पिवळे असणे सर्वसामान्य आहे. कारण बाळाच्या जन्मावेळी लाल रक्त पेशींमधील एक रंगद्रव्य वाढल्याने असे घडते. अश्या सर्वच प्रकरणांमध्ये मोठ्या उपचारांची आवश्यकता नसते परंतु जास्त कावीळ झाल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तिला दवाखान्यात घेऊन जावे असे सुईणीने पायलंड दांम्पत्याला सुचवले.
याबाबत बोलताना डिटेक्टीव्ह पीटर स्कॅसिशिया म्हणाले की, “रशेलने एलिगेलसाठी कोणतेही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला. देव कोणतीही चूक करत नाही याच गोष्टीचा पाढा ती वाचत होती. नंतर त्या बाळाने खाणे बंद केले आणि त्याच्या खोकल्यातून रक्त येऊ लागले. यानंतर रशेलने फक्त डायपर घातलेल्या तिला खिडकीजवळ नेले आणि उब मिळावी म्हणून हेअर ड्राअरची हवा मारु लागली.. "
याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, 'एलिगेलची अवस्था तीन दिवसांनी अधिक बिघडल्याने रशेलची आई रेबेका बाळाला रुग्णालयात घेऊन जायला तयार होती. मात्र तिलाही रशेलने घेऊन जाऊ दिले नाही. नंतर मात्र बाळाचा श्वासोच्छवासही बंद झाला. शेवटी तिच्या भावाने पोलिसांना कळवेपर्यंत एलिगेलचा मृत्यू झाला होता.
(प्रतिमा: लॅनसिंग पोलीस विभाग)
नंतर डिटेक्टीव्ह स्कॅक्सिया म्हणाले की , " मी वरच्या मजल्यावर गेलो तेव्हा एलिगेलचं मरण झालं होतं आणि तीन जण तिथे समोर बसून प्रार्थना करीत होते."
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पोस्टमार्टम अहवालात तिचा मृत्यू काविळीने झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे एलिगेलच्या मृत्यूनंतर रशेलने तिचा फोटो फेसबूकवर पोस्ट केला. त्यावर तिच्या नातेवाईकांनी तिला सहानूभुती दाखवली असता तिने त्यांचे आभार मानले. अजूनही ती या घटनेसंबंधित काही धार्मिक पोस्ट तिच्या फेसबूकवर करते आहे. सध्या तिने असे पेस्ट केले आहे की, ‘ परीक्षा घेऊन चांगल्या लोकांना वाचविणे आणि त्यांना न्याय मिळाल्यावर अन्यायी लोकांना शिक्षा देणं, देवाला चांगलं माहित आहे .'