शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत राडा! ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मध्यरात्री वातावरण तापलं!
2
माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य - १३ नोव्हेंबर २०२४, लाभदायी दिवस, नोकरीत यश मिळेल, घरातील वातावरण सुखद राहील
4
झारखंडमध्ये आज मतदान,  १० राज्यांत होणार पोटनिवडणूक
5
मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य
6
आजचा अग्रलेख: भुजबळ ‘सीएम’ का झाले नाहीत?
7
शिवाजी पार्कवर उद्धवसेना, मनसेची सभा होणार?; नगरविकास खात्याच्या निर्णयाकडे लक्ष
8
जगातले दुश्मन एकत्र येतात तर आम्ही एकत्र येण्यावर चर्चा तर हवी; 'लोकमत'च्या मुलाखतीत राज ठाकरेंचं वक्तव्य
9
भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा शिंदेसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा
10
उठा उठा थंडी आली, स्वेटर घालायची वेळ झाली; मुंबई २० अंशांवर, राज्यात थंडीचा कडाका होतोय सुरू!
11
२० वर्षांत मतदार नेमके कुणाकडे गेले? २००४ ते २०१९ मध्ये काय घडलं?; जाणून घ्या आकडेवारी
12
२ हजारांहून अधिक मतदार सध्या कामानिमित्त परदेशात
13
मतदान केंद्रांवर ‘सबकुछ महिला’: मतदान वाढणार?; राज्यात ४२६ केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी सज्ज
14
महागडी फी भरून शाळेत काय मिळते? - निराशा!
15
दिव्यांग, ज्येष्ठांना मतदानाला आणण्यासाठी विशेष सोय; सक्षम ॲपवर नाव नोंदवण्याचे आवाहन
16
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
17
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
19
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
20
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस

Girlfriend-Boyfriend On Rent! प्रतितास भाड्याने घ्या जोडीदार; होतो कायदेशीर करार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 10:35 AM

तुम्ही एखाद्या अ‍ॅपद्वारे काही तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कायदेशीररित्या भाड्याने घेऊ शकता.

पैशाने सर्वकाही खरेदी करता येऊ शकते असं गेल्या काही वर्षात बऱ्याचदा ऐकायला मिळाले आहे. पण प्रेम पैशाने विकत घेता येत नाही, ते अनमोल आहे असं म्हटलं जाते. पण आज याला खोटं पाडण्यासाठी काही देश प्रेमाची किंमत ठरवायला लागले आहेत. मार्केटमध्ये ट्रेडिंगमध्ये असणाऱ्या या बिझनेसला ग्राहकांचीही रांग लागली आहे. लोक हवी ती किंमत मोजायलाही तयार आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण जाणून घेऊया. 

Girlfriend-Boyfriend On Rent याचा अर्थ काही तासासाठी इमोशनल आणि इंटीमेसीचा अनुभव घेण्यासाठी मुले किंवा मुली भाड्याने घेतले जाऊ शकतात. आता तुम्हाला कुणाला इन्प्रेस करण्यासाठी रोमॅन्टिक बाता करण्याची गरज नाही. कुणाला समजवण्यासाठी त्याच्या मागे लागण्यासाठी आवश्यकता नाही. पण एक अट आहे की तुमच्याकडे पैसे असायला हवेत. कारण गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड तुम्हाला प्रतितास दराने भाड्याने घेण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे पैसा नसेल तर डेटिंगची पारंपारिक प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. 

मात्र ही सर्व्हिस अद्याप सर्व देशांमध्ये सुरू झाली नाही. केवळ चीन आणि जपान या देशातील लोक याचा पुरेपूर उपयोग करत आहेत. एका स्थानिक वृत्तपत्रानुसार, जपानी अ‍ॅपवर गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला भाड्याने घेण्यासाठी किंमत प्रति तास $30 ते $150 पर्यंत आहे, जी भारतीय चलनात २,४८१ ते १२,४०८ रुपये आहे. याशिवाय, भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला प्रवासासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.

जपानमध्ये, तुम्ही एखाद्या अ‍ॅपद्वारे काही तासांसाठी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडला कायदेशीररित्या भाड्याने घेऊ शकता. मात्र यासाठी काही नियमांचे पालन करावे, असे सांगितले जाते. यामध्ये व्यक्ती आपल्या भाड्याने घेतलेल्या जोडीदाराशी थेट संपर्क साधू शकत नाही. ही एडल्ट ओरिएंटेड सर्व्हिस नाही ज्यात बार होस्टेसपासून टॉपलेस डान्सर आणि मालिश करणाऱ्यांपर्यंतचा समावेश आहे. इतकेच नाही तर  भाड्याने घेतलेल्या जोडीदाराचे चुंबनही घेऊ शकत नाही. याशिवाय महागड्या भेटवस्तू देण्यासही मनाई आहे. एवढेच नाही तर मुलींच्या सुरक्षेसाठी ही सेवा फक्त सकाळी ६.०० ते रात्री ११.०० वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

कोण घेतात 'ही' सेवा?ही सेवा घेणारे बहुतेक लोक असे आहेत ज्यांनी कधीही गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बनवलेला नाही किंवा कोणाशी डेटवरही गेलेले नाहीत. २० वर्षांवरील सर्व वयोगटातील लोकांना जपानमध्ये ही सेवा घेणे आवडते.

भारतातही या ट्रेंडची मागणीभारतातही या व्यवसायाची मागणी वाढत आहे. गुरुग्रामच्या शकुल गुप्ता यांनी 'बॉयफ्रेंड ऑन रेंट' बोर्ड घेऊन स्वत:ची जाहिरात केली. त्याला ५० हजारांहून अधिकांनी लाईक आणि कमेंट करून त्यात रस दाखवला. अनेकांनी त्याला त्याच्यासोबतच्या करारासाठी विचारणाही केली. मात्र, यासाठी आपण कोणतेही शुल्क घेत नसल्याचेही शकुलने स्पष्ट केले. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपJapanजपान