कोणतंही नातं प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. या दोन्ही गोष्टी त्याच्यातून नाहीशा झाल्या तर नातं फार काळ टिकत नाही. अशा परिस्थितीत जर एका जोडीदाराने दुसऱ्याची फसवणूक केली तर तो विश्वासघात त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा त्रास बनतो. यानंतर बरेच लोक फसवणुकीचा बदला घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. हे लोक आपल्या पार्टनरचा बदला घेण्यासाठी असा मार्ग अवलंबतात, जो पाहून सगळेच हैराण होतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, TikTok युजर @sararhiannon88 ने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तिने तिच्या धोका देणाऱ्या प्रियकराची चोरी कशी पकडली हे सांगितलं होतं. तिने आपल्या प्रियकराचं सत्य सर्वांसमोर आणलं. हा व्हिडिओ पाहून लोकांनीही तरुणीच्या बुद्धीचं आणि बदला घेण्याच्या पद्धतीचं कौतुक केलं.
तरुणीने तिच्या प्रियकराला डिनरसाठी आमंत्रित केलं आणि भेटवस्तू दिली. तिने एक पॅकेट तिच्या प्रियकराकडे दिलं, याच्या आत नेमकं काय आहे, हे पाहण्यासाठी तिचा प्रियकर अतिशय उत्सुक होता. त्याने पाकीट उघडून आत ठेवलेला कागद पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला. या पॅकेटच्या आत अनेक पेपर होते, ज्यावर त्याच्या व्हॉट्सअॅप मेसेजचे स्क्रीनशॉट होते, ज्यात तो दुसऱ्या मुलीशी बोलत होता. त्याचं अफेअर असल्याचं त्या मेसेजवरून कळत होतं.
महिलेनं सांगितलं की, ज्या मुलीसोबत त्याचं अफेअर होतं, तिने त्याला व्हिडिओ कॉलही केला होता आणि महिलेचा जीवलग मित्र संपूर्ण सीन रेकॉर्ड करत होता. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ 24 फेब्रुवारीला पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत 28 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लोकांनी या तरुणीचं भरपूर कौतुक केलं. तरुणीने आपल्या प्रियकरासोबत ब्रेकअप केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.