Bihar : बिहारच्या शेखपुरामध्ये तरूणाने एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं. लग्नाचं आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावर ती गर्भवती झाली. पण नंतर त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. तरूणाने फसवणूक केली म्हणून तिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तक्रार नोंदवून घेत तरूणाला अटक केली. तरूण आता जेव्हा तुरूंगातून सुटून आला तेव्हा त्याने सहा महिन्याच्या मुलीला जवळ घेतलं आणि प्रेयसीसोबत लग्न केलं.
शेखपुरा जिल्ह्यातील अरियरी प्रखंड गावातील ही घटना आहे. इथे एक 20 वर्षाची तरूणी तिच्या चुलत बहिणीच्या दिराच्या प्रेमात पडली. तरूणाने तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. ती गर्भवती झाल्याचं तिला समजल्यावर तिने त्याला लग्न करण्यास सांगितलं. पण त्याने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला.
गर्भवती झाल्यावर प्रियकराने लग्न करण्यास नकार दिल्याने तरूणीने त्याच्या विरोधात महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरूंगात टाकलं. याप्रकरणी पोलीस अधिकारी चंदना कुमारी यांनी सांगितलं की, आरोपी तरूणाला 3 महिन्यांपूर्वी अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं होतं.
तुरूंगात गेल्यावर त्याचं डोकं ठिकाणावर आलं. तुरूंगातून बाहेर आल्यावर त्याने तरूणीसोबत लग्न केलं. या लग्नात दोन्ही परिवारातील लोक सहभागी झाले होते. तरूण तुरूंगात होता तेव्हा तरूणीने त्याच्या बाळाला जन्म दिला. आता हे बाळ सहा महिन्यांचं आहे.