शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

हे काय चाललंय! गर्लफ्रेंडनं दिला मुलाला जन्म, पण बॉयफ्रेंड तिच्या आईला घेऊनच झाला पसार

By प्रविण मरगळे | Published: February 19, 2021 11:42 AM

जेसने सांगितले की, तिची आई रयानसोबत फ्लर्ट करत होती, आईला माझ्यासोबत असायला हवं होतं

प्रेमात जेव्हा विश्वासघात होतो तेव्हा अनेकांना दुख: अनावर होते, Jess Aldridge हीचं वय २४ वर्ष आहे तर तिचं २९ वर्षीय Ryan Shelton सोबत प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधातून Jess नं दुसऱ्या मुलाला जन्म दिला. मात्र याच काळात रयान जेसच्या आईसोबत संबंधात आला आणि जेसला सोडून तो आईबरोबर फरार झाला.

मेट्रोमध्ये आलेल्या वृत्तानुसार, हे प्रकरण इंग्लंडमधील आहे, हॉस्पिटलमधून २८ जानेवारी जेस घरी आली, तिने रयानच्या मुलाला जन्म दिला होता, पण घरी येताच तिला समजलं की, रयान आणि जेसची ४४ वर्षीय आई Georgina तिथून ४८ किमी दूर असलेल्या एका नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. जेस म्हणाली, हा विश्वासघात आहे, एका आजीला तिच्या नातवावर प्रेम करायला हवे ना त्याच्या वडिलांवर..

जेसने सांगितले की, तिची आई रयानसोबत फ्लर्ट करत होती, आईला माझ्यासोबत असायला हवं होतं, माझी मदत करायला हवी होती पण ती माझ्या बॉयफ्रेंडसोबत राहत आहे. जेसने याआधी अनेकदा दोघांची संवाद साधला परंतु दोघांनीही रिलेशनमध्ये असल्याचा नकार दिला. काही दिवसांपूर्वी जेसने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर रयानचा मेसेज आला आणि रिलेशन संपवण्याची गोष्ट त्याने सांगितली. जेव्हा जेस घरी परत आली तेव्हा घरात रयान आणि तिची आई नव्हती.

ते दोघंही नवीन घरात शिफ्ट झाले होते, तर दुसरीकडे जेसच्या आईचं म्हणणं आहे की, आपण कुणावर प्रेम करावं हे ठरवू शकत नाही, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, इतकचं नाही तर दोघांनीही फेसबुकवरून आपलं हे प्रेम जगजाहीर केले आहे. आता नवीन घरात ते दोघंही आनंदात राहत आहेत.