Girlfriend Run away with boyfriend father : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) कानपूरमधून (Kanpur) एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणाची गर्लफ्रेंड त्याच्या वडिलांच्या प्रेमात पडली. आणि एक दिवस संधी बघून दोघेही घर सोडून फरार झाले. मुलीच्या कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा सगळं प्रकरण समोर आलं. पोलिसांनी सांगितलं की, तरूणी जबाबाच्या आधारावरच कारवाई केली जाईल.
कानपूरच्या चकेरी भागात कमलेश आपल्या 20 वर्षीय मुलासोबत औरैयाहून कामाच्या शोधात आला होता. कमलेशचा मुलगा घर बांधकाम करण्याचं काम करत होता. यादरम्यान तिथेच राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरूणीच्या तो प्रेमात पडला. तरूणी कधी कधी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जात होती. जेव्हा बॉयफ्रेंड घरी राहत नसे तेव्हा तरूणीचं बोलणं त्याचे वडील कमलेशसोबत होऊ लागलं.
हळूहळू त्यांच्यातील बोलणं वाढलं आणि तरूणी बॉयफ्रेंडच्या वडिलाच्या प्रेमात पडली. याबाबत मुलाला काहीच माहीत नव्हतं. तरूणी मार्च 2022 ला कमलेशसोबत फरार फरार झाली. कमलेशचा मुलगा घरीच होता. त्यामुळे तरूणीच्या कुटुंबियांना त्याच्यावर संशय आला नाही. त्यानंतर तरूणीच्या कुटुंबियांनी तिच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांना काहीच समजत नव्हतं की, तरूणी अखेर गेली कुठे.
पोलीस अधिकारी रत्नेश सिंहने सांगितलं की, पोलिसांना चौकशीतून समजलं की, तरूणी कमलेशच्या मुलाला भेटत होती. जेव्हा पोलिसांनी कमलेशच्या मुलाची चौकशी केली तेव्हा त्याने सांगितलं की, माझ्या प्रेयसीला माझ्या वडिलांनीच पळवून नेलं. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेणं सुरू केलं. पोलिसांना चौकशीतून समजलं की, कमलेश तरूणीसोबत दिल्लीमध्ये राहत आहे आणि एका फॅक्टरीमध्ये काम करत आहे. पोलिसांनी दिल्लीला जाऊन दोघांना ताब्यात घेतलं.
पोलिसांनी सांगितलं की, कमलेशच्या मुलाला वडिलाच्या या कारनाम्याची माहिती होती. पण बदनामीच्या कारणाने त्याने काही सांगितलं नाही. आता तरूणीचं मेडिकल केलं जाईल आणि त्यानंतर तिचा जबाब घेतला जाईल. तरूणीच्या जबाबाच्या आधारावरच पुढील कारवाई केली जाईल. पोलीस म्हणाले की, तरूणी आता कमलेशसोबतच राहण्याचं बोलत आहे. तरूणी आणि कमलेश दोघेही वयस्क आहेत. अशात तिच्या जबाबानुसार कारवाई केली जाईल.