कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचं पिल्लू, मांजराच्या पोटी मांजराचं पिल्लू, सिंहाच्या पोटी छावा, वाघाच्या पोटी बछडाच जन्माला येतो हे आपल्याला माहितीच आहे. पण कधी कोणत्या प्राण्याच्या पोटी माणूस जन्माला आल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? यावर विश्वासच बसणार नाही. पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. एका बकरीच्या पोटी चक्क माणसासारखं दिसणारं कोकरू जन्माला आलं आहे (Aasam goat gave birth human like baby) या बकरीच्या पिल्लाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या बकरीने माणसासारख्या दिसणाऱ्या पिल्लाला जन्म दिलं आहे. आसामच्या कछार जिल्ह्यातीलही धक्कादायक घटना आहे. या घटनेमुळे सर्वजण हैराण झाले आहेत. या पिल्लाला पाहण्यासाठी एकच गर्दी जमली आहे.
माहितीनुसार गंगा नगर गावांतील एका पाळीवर बकरीने अशा विचित्र पिल्लाला जन्म दिला. बकरीच्या या पिल्लाला दोन पाय आणि कान आहेत. या दोन अवयवांशिवाय ते पिल्लू हुबेहूब माणसांसारखं दिसत होतं. त्याला शेपटी नव्हती, त्याचा चेहरा माणसासारखा होता. सोशल मीडियावर या विचित्र पिल्लाचा फोटो व्हायरल झाला. ज्यामध्ये हे पिल्लू पूर्णपणे विकसित झालेलं नसल्याचं दिसतं. हे पिल्लू जन्माच्या अर्ध्या तासांनीच दगावल्याचं सांगितलं जातं आहे.
याआधी इंडोनेशियामधील (Indonesia) एका मच्छिमारालाविचित्र दिसणारं शार्क माशाचं पिल्लू सापडलं होतं. या माशाचं तोंड हे माणसांसारखं होतं. 48 वर्षीय अब्दुल्लाह नुरेन (Abdullah Nuren) हे समुद्रात मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात त्यांना एक मासा आढळून आला. या माशाला आणल्यानंतर त्याला कापले. यावेळी त्याच्या पोटात त्यांना माशाची तीन पिल्ले आढळून आली. यामध्ये दोन माशांचे तोंड हे सामान्य माशाप्रमाणे होते. पण तिसरा मासा पाहिल्यानंतर त्यांना झटका बसला. कारण म्हणजे या माशाचे तोंड हे सामान्य नसून माणसासारखे दिसत होते. जाणकार या प्रकाराला म्यूटेशन म्हणत असून हा मासा खूप प्रसिद्ध झाला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना नुरेन यांनी सांगितलं, मादी शार्क (Female Shark) माझ्या जाळ्यात सापडल्यानंतर मी तिला घरी आणून कापलं. परंतु तिच्या पोटातून तीन शार्क पिल्लं निघाली. यामधील दोघे सामान्य शार्कप्रमाणे दिसत होती. तर तिसरं पिल्लू हे माणसासारखं दिसत होतं. यामध्ये त्याचे डोळे मोठे आणि गोल असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. या माशाला पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.