सोन्याचं टॉयलेट चोरी केल्याप्रकरणी चार लोकांवर आरोप सिद्ध झाले आहेत. ही चोरी 2019 मध्ये झाली होती. टॉयलेट 18 कॅरेट सोन्यापासून बनलं होतं. टॉयलेट एका आर्ट इन्स्टॉलेशनचा भाग होतं. हे ब्रिटनच्या ब्लेनहेम पॅलेसमधून चोरी करण्यात आलं होतं. टॉयलेटचं नाव अमेरिका होतं. ज्याची किंमत 4.8 मिलियन पाउंड म्हणजे 50 कोटी रूपये होती.
हे सोन्याचं टॉयलेट इटलीतील कलाकार मोरिजोओ कॅटेलन याने बनवलं होतं. ब्लेनहेम पॅलेस एक ऐतिहासिक स्थान आहे. हे ब्रिटनचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांचं जन्मस्थान म्हणून फेमस आहे. चारही आरोपींना 28 नोव्हेंबरला ऑक्सफोर्ड मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केलं जाणार आहे.
स्काय न्यूजच्या रिपोर्टनुसार, गोल्ट टॉयलेट आधी 2016 मध्ये न्यूयॉर्कच्या गुगेनहेम म्युझिअमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. जिथे लोक याचा वापर करू शकत होते. एक सुरक्षा रक्षक बाहेर थांबत होता. म्युझिअमने एकदा हे टॉयलेट अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही वापरायला दिलं होतं.
ब्लेनहेम पॅलेसचे चीफ एक्झीक्युटीव्ह डोमनिक हेअर यांनी द गार्जियनला सांगितलं की, चोरीच्या निरर्थक कामातून ही वस्तू अजरामर बनेल.