तंत्रज्ञानामुळे लोकांचं जीवन सोपं होत आहे. सोबतच यामुळे काही समस्यांचाही सामनाही करावा लागत आहे. जर तुम्ही गुगल मॅप्स किंवा गुगल स्ट्रीट व्ह्यूचा वापर केला का? जर केला असेल तर तुम्हाला त्यातील फोटो फीचरबाबत नक्कीच माहिती असेल. फीचरमुळेच पेरुतील एका कपलचा घटस्फोट झालाय. गुगल मॅपच्या मदतीने पतीला पत्नीच्या अफेअरबाबत कळाले.
मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण अमेरिकेतील पेरुची राजधानी लिमा येथील ही घटना आहे. इथे गुगल मॅचमुळे एका कपलचा घटस्फोट झाला. म्हणजे या मॅपच्या माध्यमातून महिलेच्या पतीने आपल्या तिला एका दुसऱ्या पुरुषासोबत पाहिले.
या महिलेच्या पतीने सांगितले की, तो गुगल मॅपच्या माध्यमातून रस्ता शोधत होता. तेव्हाच मॅपवर एक महिला दिसली. तिने त्याच्या पत्नीसारखेच कपडे परिधान केले होते. जेव्हा त्याने आणखी काळजीपूर्वक पाहिले तेव्हा ती त्याची पत्नीच असल्याचे स्पष्ट झाले.
या व्यक्तीने त्यावेळी पत्नीला काहीच विचारले नाही. जेव्हा ती घरी आली तेव्हा त्याने याबाबत विचारणा केली. पण पत्नीने असं काही नसल्याचं खोटं सांगितलं. मग त्याने पत्नीला त्यांचा फोटो दाखवला. त्यात ती तिच्या प्रियकरासोबत बसली होती. तेव्हा तिने हे मान्य केलं की, तिचं अफेअर आहे.
या फोटोमध्ये महिला आपल्या प्रियकरासोबत बेंन्चवर बसली होती. प्रियकराचं डोकं तिच्या मांडीवर होतं आणि ती त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत होती. हा फोटो समोर आल्याने पतीने पत्नीला घटस्फोट दिला. या व्यक्तीने फेसबुकवर पत्नीचा हा फोटो टाकला आणि त्यानंतर त्यांच्यात घटस्फोट झाला.