अवघ्या २० वर्षाचा मुलगा आठवड्यातून फक्त पाच तास काम करतो आणि यासाठी करोडोंमध्ये पगार घेतो. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. पण, हे खरे आहे. दरम्यान, सध्या गुगलचा एक टेक एक्सपर्ट याच कारणामुळे चर्चेत आहे. २० वर्षीय डेव्हॉन नावाचा हा तरुण दिवसातून फक्त एक तास काम करतो आणि त्याला वर्षाला दीड लाख डॉलर्स (सुमारे १.२ कोटी रुपये) पगार मिळतो.
फॉर्च्युनच्या रिपोर्टनुसार, जर जास्त तास काम करावे लागले तर स्टार्टअपमध्ये सहभागी व्हायला आवडेल, असे गुगलच्या या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, टेक एक्सपर्टचे खरे नाव समोर आले नाही, पण त्याला डेव्हॉन या नावानेही ओळखले जाते. या तरुणाला साइन इन बोनस सुद्धा मिळाला आहे. यासोबतच त्याला वर्षअखेरीस बोनसचीही अपेक्षा आहे.
डेव्हॉनने काम गुगलच्या 'टूल अँड प्रॉडक्ट'साठी कोडिंग करणे आहे. विशेष म्हणजे डेव्हॉनला मॅनेजरच्या मेसेजला रिप्लाय द्यायलाही बांधील नाही. त्याच्या मते, तो दिवस संपल्यानंतरही मॅनेजरला उत्तर देऊ शकतो. यात मॅनेजरलाही काही अडचण नाही. दरम्यान, डेव्हॉन याआधी गुगलमध्ये इंटर्न होता. या दरम्यान कोडिंग लवकरात लवकर पूर्ण करून तो सुट्टीवरही जायचा.
डेव्हॉन म्हणाला की, "इंटर्नशिपदरम्यानच मला कळले की जर मला या कंपनीत नोकरी मिळाली तर मला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. त्यामुळेच इंटर्नशिपच्या काळात सर्व कामे अतिशय मेहनतीने पूर्ण केली. बहुतेक लोक वर्क लाइफ बॅलन्स आणि अतिरिक्त फायद्यांमुळे गुगल कंपनी निवडतात." रिपोर्टनुसार, ५७ टक्के गुगल कर्मचार्यांचा विश्वास आहे की हे एक उत्तम कामाचे ठिकाण आहे. खरंतर, उत्कृष्ट कार्यालय, कामाचे वातावरण आणि उच्च पगार यामुळे गुगल ही लोकांची सर्वात आवडती कंपनी आहे.