Bride Groom: छत्तीसगढच्या कोंडागांव जिल्ह्यात एक अनोखं लग्न समोर आलं. इथे एका नवरदेवाने एकाच मंडपात दोन नवरींसोबत लग्न केलं. या लग्नाची सर्वात खास बाब म्हणजे हे लग्न करण्यासाठी दोन्ही तरूणीची सहमती होती. ही घटना उमला गावातील आहे. हा नवरदेव लग्नाच्या आधीच दोन मुलांचा वडील झाला आणि दोन बायकांचा पतीही.
उमला गावातील रंजनसिंह याचे वडील सुखराम सलान यांनी आडेंगा गावातील दुर्गेश्वरी मरकानसोबत त्याचं लग्न जुळवलं होतं. काही दिवसांनी दोघांचा साखरपुडा केला गेला. तेव्हापासून तरूणी तरूणाच्याच घरी राहत होती. काही महिन्यानंतर एका बाळाचा जन्म झाला. दरम्यान रजनसिंह आंवरी गावातील सन्नो बाई गोटावर प्रेम जडलं. सन्नो आणि रजनसिंह यांचंही प्रेम इतकं पुढे गेलं की, त्यांनाही एक बाळ झालं. तरूणीसोबतच प्रेम संबंधामुळे लग्न करताच तो दोन मुलांचा पिता झाला.
हे प्रकरण लोकांना समजताच समाजात वेगवेगळी चर्चा सुरू झाली होती. अशात रजनसिंह परिवार आणि समाजाच्या सहमतीने दोन्ही तरूणींसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न पत्रिकेत दोन्ही तरूणींचं नाव होतं. 8 मे रोजी त्यांचं लग्न झालं. या अनोख्या लग्नात आजूबाजूच्या गावातील बरेच लोक आले होते.