उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिथे हनिमून साजरा केल्यानंतर नवरदेव आपल्या नववधूला सोडून पहाटे कुठेतरी निघून गेला. कुटुंबीय बराच वेळ परत येण्याची वाट पाहत होते. पण तो परत न आल्याने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली.
नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत सांगितले की, नवरदेव आपला फोन आणि पैसे इथेच सोडून गेला आहे. त्याचा सर्व ठिकाणी खूप शोध घेतला पण काहीही पत्ता लागला नाही. कुटुंबीयांनी नववधूकडे याबाबत विचारपूसही केली मात्र तिलाही काही माहीत नाही. पीडितेच्या कुटुंबीयांकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता वराचा शोध सुरू केला आहे.
22 वर्षीय वर सोमवारी पहाटे अचानक घरातून निघून गेला. त्याने पांढरा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅन्ट घातल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 17 फेब्रुवारीला त्यांची वरात मन्सूर नगर गावात गेली. 18 फेब्रुवारी रोजी नवरी निघून सासरच्या घरी पोहोचली. हनिमून साजरा केल्यानंतर सोमवारी सकाळी कोणाला काहीही न सांगता वर घरातून गायब झाला. नातेवाईकांनी त्याला पहाटे घराबाहेर जाताना पाहिले मात्र कोणीही लक्ष दिले नाही. तो येईल असे सर्वांना वाटले.
बराच वेळ तो परत न आल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली, त्यानंतर कुटुंबीयांना काही तरी अनुचित प्रकार झाल्याचा संशय आल्याने कुटुंबीयांनी गावातून सर्व नातेवाईकांना फोन करून विचारपूस केली, मात्र काहीच कळले नाही. या प्रकरणावर अतिरिक्त पोलिस अधीक्षक दुर्गेश सिंह यांनी सांगितले की, विवाह 17 फेब्रुवारी रोजी झाला होता. सर्व काही व्यवस्थित चालले होते. 19 फेब्रुवारीला सकाळी तो न सांगता अचानक घरातून निघून गेला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"