नवरी मंडपात नवरदेवाची वाट बघत होती. घरातील लोकही लग्नाची तयारी करण्यात व्यस्त होते. सगळ्यांची नजर दरवाज्यावर होती. मंडप तयार झाला होता. अशात ऐनवेळी समजलं की, नवरदेव पळून जाणार आहे. काही कारणामुळे नवरदेव पळून गेला. यात त्याला यश मिळणार त्याआधीच नवरीने नवरदेवाला पकडलं आणि रस्त्यातील एका मंदिरात त्याच्यासोबत लग्न केलं.
ही घटना बरेली शहरातील आहे. या भागात राहणाऱ्या तरूणीचं अडीच वर्षापासून बदायूं जिल्ह्यातील बिसौलीमधील तरूणासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. दोघांच्या सहमतीने दोन्ही कुटुंबियांनी लग्नाची तारीख ठरवली. या रविवारी भूतेश्वर नाथ मंदिरात तरूणीच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्नाची सगळी तयारी केली गेली. नवरी मंडपात नवरदेवाची वाट बघत होती.
यादरम्यान नवरदेवाने काही कारणाने लग्न करण्याचा विचार बदलला. नवरदेवाने तरूणीसोबत लग्न करण्यास नकार दिला आणि संधी मिळताच तिथून पळून गेला. तेच मंडपात बसलेल्या नवरीला याची माहिती मिळाली. तिने नवरदेवाला फोन केला तर तो वेगवेगळ कारणे सांगू लागला. तो म्हणाला की, तो त्याच्या आईला आणण्यासाठी बदायूंला जात आहे.
नवरीने हे ऐकताच तिला संशय आला की, प्रियकर लग्न टाळून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतर नवरीने त्याचा पाठलाग केला आणि बरेली शहरापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर त्याला पकडलं. जबरदस्ती नवरदेवाला बसमधून उतरवून मंडपाकडे नेऊ लागली. साधारण दोन तास हा ड्रामा सुरू होता.
नंतर परिवारातील लोकांसोबत बोलणं झालं आणि त्यांनी दोघांचं लग्न भमोरातील मंदिरात लावून दिलं. जेव्हा नवरीने भमोरा बसमध्ये नवरदेवाला पकडलं तेव्हा खूप गोंधळ झाला. त्यानंतर त्यांचं लग्न लावून देण्यात आलं.
पहिल्यांदाच बरेलीमध्ये एका नवरीने प्रियकराला लग्न मंडपापर्यंत आणण्यासाठी इतकी हिंमत दाखवली. तिने बसचा 20 किमी पाठलाग केला. नवरदेवाला मंडपात घेऊन आली. या घटनेची परिसरात सध्या चर्चा सुरू आहे.