नवी दिल्ली - विवाह सोहळ्यामध्ये वधू-वर हे नवनवे उंची कपडे घालतात. सोहळा अगदी साधेपणात झाला तरीही वधु-वरांच्या पोशाखाकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र तुम्ही कधी कपड्यांऐवजी संपूर्ण शरीरावर पट्ट्या आणि बँडेज गुंडाळून लग्न सोहळ्यात सहभागी झालेला नवरदेव तुम्ही कधी पाहिला नसेल. मात्र सध्या सोशल मीडियावर एका एका वराचा फोटो शेअर होत आहे, तो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या फोटोमधील वर लग्नामध्ये केवळ शॉर्ट्स घालून कपड्यांऐवजी पट्ट्या आणि बँडेज बांधून बसलेला दिसत आहे.
ही घटना इंडोनेशियामधील आहे. वर अशा अवतारात बसला असला तरी वधूने मात्र पारंपरिक पोशाख परिधान केलेला आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार विवाहापूर्वी काही दिवस आधी वराचा अपघात झाला होता. त्यामुळे त्याला खूप जखमा झाल्या होत्या. त्यामुळे विवाह सोहळ्यात त्याने केवळ शॉर्ट्स परिधान करून पट्ट्या आणि बँडेज बांधून विवाहाची औपचारिकता पार पाडली. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर लोक त्यावर कमेंट्स करत आहेत. तसेच लग्नाची एवढी घाई काय होती. काही काळानंतर विवाह करता आला असता, असे म्हणत आहेत.
सोशल मीडियावर विवाहाचा हा फोटो एका युझरने २ एप्रिल रोजी शेअर केला होता. त्यावर आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लाइक्स आल्या आहेत. तसेच लोक या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. या फोटोमध्ये तुम्ही बँडेज आणि पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत स्टेजवर बसलेला नवरदेव तुम्ही पाहू शकता.