लग्नाच्या ऐनवेळी १०वी चा पेपर देण्यास गेला नवरदेव, नवरी बघत राहिली वाट आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:17 PM2022-02-28T17:17:24+5:302022-02-28T17:18:22+5:30
छतरपूरच्या कल्याण मंडपममध्ये बुंदेलखंड परिवाराने सामूहिक विवाह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे एकत्र ११ जोडप्यांचं लग्न होणार होतं.
मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) छतरपूरमध्ये शनिवारी एक वेगळी घटना समोर आली आहे. इथे एक नवरी हातावर मेहंदी लावून मंडपात नवरदेवाची वाट पाहत बसली होती. तिचा नवरदेव ३ तासांनंतर आला आणि मग त्याने तिच्यासोबत सात फेरे घेतले. याचं कारण होतं दहावीची परीक्षा. नवरदेव लग्नाच्या आधी परीक्षा देण्यास गेला होता. त्यानंतर त्याने नव्या जीवनाला सुरूवात केली.
छतरपूरच्या कल्याण मंडपममध्ये बुंदेलखंड परिवाराने सामूहिक विवाह संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. इथे एकत्र ११ जोडप्यांचं लग्न होणार होतं. यातील एक जोडी होती रामजी सेनन आणि प्रीती सेन यांची. रामजीचं वय २१ वर्षे आणि प्रीतीचं वय १९ वर्षे. लग्न लागण्याच्या वेळेवर रामजी परीक्षा देण्यासाठी मंडप सोडून गेला होता. प्रीतीही स्टेजवर बसून त्याची वाट पाहत होती.
याबाबत रामजी सेन म्हणाला की, त्याची १०वी परीक्षा आणि लग्न एकाचवेळी आलं. पण मी ज्यासाठी वर्षभर मेहनत घेतली तेही काम पूर्ण करणं गरजेच होतं. मी पेपर दिला आणि मला रिझ्ल्टही चांगला येण्याची आशा आहे. आज जीवनाच्या दोन परीक्षा झाल्या. एका शिक्षणाची आणि दुसरी जीवनाची.
तेच नवरी प्रीती सेन म्हणाली की, मी मंडपात तीन तास नवरदेवाची वाट पाहिली. कारण तो त्याचा १०वी चा पेपर देण्यासाठी गेला होता. पतीने जे केलं ते दोघांच्याही भविष्यासाठी चांगलं आहे. महत्वाची बाब म्हणजे नवरीला तीन तास वाट बघावी लागली यावर कुणाला काही समस्या नव्हती. दोन्ही पक्ष म्हणाले की, त्यांच्या मुलाने वर्षभर जी मेहनत घेतली, त्याचा चांगल्या परिणामासाठी पेपर देणं गरजेचं होतं.