शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

लग्नात नवरदेवाला शाहरूख खान बननं पडलं महागात, नवरीने पाठवलं त्याला तुरूंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 11:24 AM

लग्नात आलेले लोक नवरदेवाच्या डोक्यात फरक असल्याचं बोलले. ज्यानंतर मुलीकडील आणि मुलाकडील लोक आमने-सामने आले.

उत्तर प्रदेशच्या मऊ जिल्ह्यातील कोपागंजमध्ये रविवारी एका तरूणीच्या लग्नासाठी वरात आली होती. वरात आल्यावर मुलीकडील लोकांनी त्यांचं स्वागत केलं. रात्री वेगवेगळे रितीरिवाज पार पडले. हार घालण्याचा रिवाज करण्यासाठी नवरी स्टेजवर आली आणि तिला पाहून नवरदेव विचित्र वागू लागला. नवरीला पाहून नवरदेव अचानक शाहरूख खानचे डायलॉग बोलू लागला. नवरदेव स्टेजवर आला आणि लोकांच्या मनोरंजनासाठी तो शाहरूख खानची अॅक्टिंगही करू लागला. हे पाहून नवरी चांगलीच संतापली आणि तिने थेट लग्न करण्यास नकार दिला. नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि नवरदेवला पोलीस आपल्यासोबत घेऊन गेले.

असं सांगण्यात आलं की, नवरीला बघून नवरदेवाने डायलॉग मारला की,  'मरते दम तक लेकर जाउंगा दुल्हन, मांग में सिंदूर भी डालूंगा. आशिक हूं मैं, कातिल भी हूं, सबके दिलों में राज करने वाला भी हूं, मैं वादों से मैं मुखरता नहीं मरने से डरता नहीं'. यानंतर मुलीकडील लोकांना वाटलं की, नवीन जावई एखाद्या गोष्टीमुळे नाराज झाला असेल. त्यामुळे त्याला समजावण्यातही आलं. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्यानंतर लग्नात गोंधळ सुरू झाला.

लग्नात आलेले लोक नवरदेवाच्या डोक्यात फरक असल्याचं बोलले. ज्यानंतर मुलीकडील आणि मुलाकडील लोक आमने-सामने आले. यादरम्यान नवरदेव अचानक स्टेजवर गेला आणि तिथे उपस्थित लोकांना धमकी देऊ लागला होता.

पोलिसांचं नाव ऐकताच नवरदेव म्हणाला की, पोलिसांना बोलवा किंवा कुणालाही काही फरक पडत नाही. अनेक तासांच्या गोंधळानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनीही नवरदेवाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यासमोरही तो लोकांना धमकी देऊ लागला होता. पोलिसांनी नवरदेव, त्याचे भाऊ आणि नवरीच्या भावांना ताब्यात घेतलं आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारी