काही जणांची कंबर अत्यंत लवचिक असते त्यामुळे ते हुलाहुप डान्स अगदी मजेत करू शकतात. हुलाहुप म्हणजे गोल नळी सारख्या आकाराची मोठी रिंग. ती कंबरेत घालुन फिरवतात. आतापर्यंत तुम्ही हुलाहुप करणारे कितीतरी व्हिडिओ पाहिले असतील पण ते कंबरेत रिंग घालुन हुलाहुप केलेले पण इंटरनेटवर सध्या एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या महिलेने चक्क बमवर रिंग फिरवुन हुलाहुप केले आहे. मुख्य म्हणजे तिच्या या टॅलेंटची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे.
या महिलेने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या यादीत पहिल्यांदाच असा उपक्रम केला आहे. या महिलेचे नाव अँड्रिया एम आहे आणि तिने आपल्या बम्प्सवर सलग 31 मिनिट 25 सेकंद हुला हूप केलं आहे. तिचा हा रेकॉर्ड बघुन अनेकांनी तोंडात बोट घातली तर अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांना तिने अशा पध्दतीचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची प्रेरणाही दिली आहे. तिने केलेला हा पहिला रेकॉर्ड असल्याने रेकॉर्डसच्या यादीत नवा विभाग सुरु झाला आहे. त्यामुळे अनेकांना आता या विभागात नवे रेकॉर्ड करण्याची व तिचा रेकॉर्ड तोडण्याचीही संधी आहे.कसा केला तिने रेकॉर्ड?अँड्रिया गेली दोन वर्ष बमवर हुलाहुप करण्याचा सराव करत होती. तीने यासाठी भरपूर कष्ट घेतले आहेत. ती सांगते की, बमवर हुलाहुप फिरवताना मांडीच्या स्नायुंमध्ये भरपूर वेदना होतात पण ध्येयाने झपाटल्याने मी हे लक्ष्य साध्य केलं आहे.हा व्हिडिओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केलेला आहे. याला आतापर्यंत ७० हजारच्या वर लाईक्स मिळालेले आहेत.