शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची अनोखी गोष्ट; नवरीशिवाय निघाली नवऱ्याची वरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 16:26 IST

धुमधडाक्यात लग्न करण्याचं स्वप्न पूर्ण

साबरकांठा: गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यापासून जवळपास 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या चंपलानार गावात शुक्रवारी एक अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नाची वरात निघण्याआधी गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं. 27 वर्षांच्या अजय बारोटला हळद लावण्यात आली. शेरवानी घातलेला अजय घोडीवर बसला. या वरातीला जवळपास 200 जण उपस्थित होते. यानंतर अजयच्या घरी 800 लोकांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुजराती परंपरेनुसार अजयचा विवाह संपन्न झाला. मात्र या लग्नात नवरी नव्हती. कारण या लग्नाचं आयोजन अजयची इच्छा पूर्ण करण्यासाठी करण्यात आलं होतं. अजयला लर्निंग डिसॅबिलिटी असल्यानं त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती. पण आपला विवाह सोहळा धुमधडाक्यात संपन्न व्हावा, अशी अजयची इच्छा होती. काही महिन्यांपूर्वीच अजयच्या चुलत भावाचा विवाह सोहळा पार पडला. त्यावेळी मोठी वरात काढण्यात आली होती. तेव्हापासून अजयनं वरात काढण्याचा हट्ट धरला.  अजयला नृत्याची आवड असल्याचं त्याचे काका कमलेश बारोट यांनी सांगितलं. 'अजय गावातल्या प्रत्येक लग्नात जातो. तिथे नृत्य करतो. फेब्रुवारीत माझ्या मुलाचं लग्न झालं. माझ्याही लग्नात अशाच प्रकारचं आयोजन करण्यात यावं, अशी अजयची इच्छा होती. माझ्या मुलाच्या लग्नानंतर तर तो हट्टाला पेटला. त्यालाही लग्न करायचं होतं. अजयचा हट्ट कमी होत असल्यानं मग संपूर्ण कुटुंबानं त्याची वरात काढण्यात निर्णय घेतला. आम्ही लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापल्या. मंत्रोच्चारासह सर्व विधी पूर्ण केले. त्यानंतर सर्वांना मेजवानी देण्यात आली,' असं कमलेश म्हणाले. त्यामुळे दिवसभर अजय अतिशय आनंदात होता. ते पाहून आम्हाला समाधान वाटलं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :marriageलग्नGujaratगुजरात