कोरोना काळात मास्क आणि हॅंड सॅनिटायजर आता लोकांच्या जीवनाचा भाग झालं आहे. पण हॅंड सॅनिटायजरसंबंधी एक घटना जाणून घेतल्यावर तुम्ही त्याचा नक्की काळजीपूर्वक वापर कराल. ही घटना आहे टेक्सासमधील. इथे एक महिला हॅंड सॅनिटायजरमुळे थेट ICU मध्ये भरती झालीय आणि बरी होण्याची वाट बघत आहे. कथितपणे महिला मेणबत्ती पेटवत होते आणि हॅंड सॅनिटायजरमुळे आगीच्या कचाट्यात आली.
राउंड वॉकमध्ये राहणारी Kate Wise ने सांगितले की, रविवारी तिने हॅंड सॅनिटायजर लावलं आणि ज्याचा वापर गेल्या काही महिन्यांपासून ती आणि तिच्या मुली कोरोना व्हायरसच्या बचावासाठी करतात. हॅंड सॅनिटायजर लावून ही महिला मेणबत्ती पेटवत होती. अचानक आगीने पेट घेतला.
तिने पुढे सांगितले की, मेणबत्ती पेटवण्यासाठी फार कमी आगीची गरज असते. पण हॅंड सॅनिटायजरमुळे आग पसरली आणि ती आगीच्या कचाट्यात आली. या महिलेने पूर्ण हातावर सॅनिटायजर लावलं होतं. सॅनिटायजरची बॉटलही आगीत सापडली आणि एक जोरदार स्फोट झाला. हा आगीचा भडका माझ्या चेहऱ्यावर आला आणि काही सेकंदात माझं पूर्ण शरीर आगीत भाजलं.
ही घटना पाहून माझ्या मुली शेजाऱ्यांकडे मदत मागण्यासाटी गेल्या. तर Kate जळत असलेले कपडे काढण्यात, दिव्यांग मुलीला आणि पाळीव कुत्र्याला घराबाहेर काढण्यात यशस्वी ठरली. आता द राउंड रॉक फायर डिपार्टमेंट आग लागण्याच्या कारणाचा तपास करत आहे.