मध्यप्रदेशातील भोपाळ येथे प्रसिद्ध संकट मोचन हनुमानजी दक्षिणेस तोंड असलेल्या विशाल पिंपळाच्या झाडाखाली स्थित आहेत. हनुमानजी शक्तीशाली असल्यानं आजारांपासून दूर राहतात असे म्हणतात. हनुमानजींना शिस्तबद्ध जीवनशैली आवडते, शिस्तबद्ध जीवनशैली जगणारे आणि हनुमानजींची उपासना करणारे भक्त हनुमानास प्रसन्न करतात.
हनुमान भक्त नेहमी निरोगी राहतात असं म्हटलं जातं. (हरे सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा ) २०२१ मध्येही कोरोनाकाळात या ओळी सत्य दर्शवत आहेत. २०० वर्षांहून अधिक जुन्या छिंद धामच्या मंदिरात लोक दूरवरुन येतात. या मंदिराचे महत्व आणि महती काय आहे. याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
हनुमान नक्की नर होता की वानर? पाहूया वाल्मीकी रामायाणातील संदर्भ!
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ जवळ रायसेन जिल्ह्यातील बरेली तहसीलच्या छिंद या गावात एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हनुमानजी येथे अशा प्रकारे प्रसन्न आहेत की अद्याप या गावात कोरोना संसर्ग होऊ शकलेला नाही. खरं पाहता कोरोनाव्हायरस खेड्यापाड्यापर्यंत पसरलं आहे, पण हनुमानजींच्या कृपेमुळे आजपर्यंत गावातील एकही व्यक्ती या साथीच्या आजारात आली नाही. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शन घेण्यासाठी येतात. विशेषत: मंगळवार आणि शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून भाविकांच्या रांगा लागतात.
विशेष कार्यक्रम असल्यास जत्रा भरते
येथे दरवर्षी हनुमान जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी कोरोना संसर्गामुळे प्रवेश बंद आहे. लोक कुटुंब आणि मित्रांसह येऊन येथे प्रार्थना आणि उपासना करतात. अनेक भक्त भंडारा आयोजित करून प्रसादाचे वाटप करतात. येथे भजन, कीर्तन दिवस-रात्र केले जाते आणि परिसरात मेळा भरतो. हे मंदिर सुमारे 200 वर्ष जुने आहे.
सप्तचिरंजिवांमध्ये हनुमंताला स्थान कसे प्राप्त झाले? त्याची कथा
पुरातन मुर्तीबद्दल असे सांगितले जाते की, या जागेच्या मालकास शेतात काम करत असताना बजरंगबलीची मूर्ती मिळाली. त्यानंतर त्याच ठिकाणी शेतकर्याने एक लहान माडी तयार केली आणि हनुमानजींची मूर्ती स्थापित केली. त्या दिवसापासून येथे पूजेस सुरुवात झाली आणि हनुमानजींचा महिमा पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. हळहळू लाखो भाविक दर्शनासाठी येऊ लागले.