कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे संपूर्ण जगभरात हाहाकार पसरला आहे. शासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून जास्तीत जास्त लोकांचा बचाव व्हावा याासाठी रविवारी जनता कर्फ्यु शासनाकडून घोषित करण्यात आला होता.
या दिवशी उत्तरप्रदेशातील हापुडगड रोडवर असलेल्या एका जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री जन्माला आलेल्या एक गोंडस मुलीचे नाव तिच्या आई- बाबांनी ''कोरोना' असं ठेवलं आहे. लोकांच्या मनात कोरोनाविषयी प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. पण लोकांना घाबरण्याची काहीही गरज नाही. जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. असं या मुलीच्या पालकांनी सांगितलं इतकंच नाही तर मिठाई वाटून कोरोना नाव ठेवल्याची माहिती सुद्धा दवाखान्यातील स्टाफला देण्यात आली. ( हे पण वाचा- Coronavirus : आपला जीव वाचवणाऱ्या मास्कचा वापर कधी सुरू झाला होता? जाणून घ्या इतिहास...)
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मेरठमधील आवास विकास कॉलनीमध्ये राहत असलेल्या नवीन शर्मा यांच्या पत्नीला प्रसृतीच्या कळा सुरू झाल्या. त्याच दिवशी म्हणजेच रविवारी संध्याकाळी कर्फ्यु सुद्धा होता. त्यावेळी नवीन शर्मा यांनी आपल्या पत्नीला रुग्णालयात भरती केले. रविवारी रात्री या मुलीचा जन्म झाला. ( हे पण वाचा-Coronavirus : वाह रे वाह! 'वेळ जात नाही म्हणून पत्नींना सोबत राहू द्या', क्वारेंटाईनमधील रूग्णांची विचित्र मागणी!)