हल्ला केल्याच्या खटल्यात पेनसिल्व्हानियात न्यायमुर्तींच्या कार्यालयात न्यायालयाचे शुल्क भरण्यासाठी स्टीव्हन रॅगो (३१) याने पैसे भरण्याच्या खिडकीपाशीच एकाचे पाकीट मारले व त्या पैशातून न्यायालयाचे शुल्क भरले. रॅगोने मारलेलेल पाकीट. रॅगो हा साध्या अशा हल्ल्याच्या खटल्यात सध्या जामिनावर सुटलेला आहे. तो न्यायालयाने सांगितलेले शुल्क भरायला तो जिल्ह न्यायालयात गुरुवारी आला होता. सीसीटीव्ही कॅमेºयाने रॅगोने मारलेल्या पाकिटाचे व ते बनियनच्या आत टाकतानाचे दृश्य टिपलेले आहे. नंतर या पाकिटातील पैशांतून तो न्यायालयाचे शुल्क भरताना दिसला. पाकीट मारल्याचे रॅगोने पोलिसांकडे कबूल करून ते परत केले. त्याने त्यातील वापरलेले पैसेही परत केले. परंतु त्याने केलेल्या नव्या चोरीमुळे त्याचा जामीन आता रद्द करण्यात आला आहे. त्याच्यावर सुरू असलेल्या साध्या हल्ल्याच्या खटल्याच्या प्राथमिक सुनावणीसाठी त्याला आता तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
न्यायालयाचे शुल्क त्याने तेथेच पाकीट मारून भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:26 AM