Relationship Insurance: आपल्या जीवनात आरोग्या विमा, अपघात यांसारख्या गोष्टींचा विमा काढतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, प्रेम आणि रिलेशनशिपमध्येही विमा काढला जाऊ लागला आहे. जर तुम्हाला याबाबत अजूनही माहीत नसेल तर मग काय...? नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे. एका तरूणाला ब्रेकअपनंतर विम्याचे पैसे मिळाले आहेत. चला जाणून घेऊ या खास घटनेबाबत...
दोघांनी मिळून काढला होता विमा
ट्विटरवर प्रतीक आर्यन नावाच्या एका तरूणाने एक ट्विट केलं आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, मला 25000 रूपये मिळाले आहेत. कारण माझी गर्लफ्रेंड माझ्यापासून वेगळी झाली. जेव्हा आमचं नातं सुरू झालं होतं तेव्हा आम्ही या नात्यादरम्यान एका जॉइंट खात्यामध्ये दर महिन्याला 500 रूपये जमा केले आणि एका विमा काढला. या विम्यात असं होतं की, जो कुणी नातं तोडेल तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला सगळे पैसे मिळतील.
हार्टब्रेक इंश्युरन्स फंड (HIF)
इतकंच नाही तर या तरूणाने या इंश्युरन्सचं नावही सांगितलं. त्याने लिहिलं की, हा हार्टब्रेक इंश्युरन्स फंड (HIF) आहे. हा मुळात दोघांच्या सहमतीने करण्यात आलेला इंश्युरन्स होता. म्हणजे असं होतं की, पार्टनरला रिलेशनशिपमध्ये लॉयल रहावं लागेल. जर एक कुणी वेगळा झाला तर सगळे पैसे गमावेल आणि दुसऱ्याला सगळे पैसे मिळतील. तरूणाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली आहे.
या तरूणाने हे ट्विट तीन दिवसांआधी केलं आणि पाहता पाहता ते व्हायरल झालं आहे. लोक यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. कुणी म्हणत आहे यात विम्यात जास्त पैसे मिळायला हवे तर कुणी म्हणतंय की, रिलेशनशिप जास्त काळ चाललं असतं तर पैसे जास्त मिळाले असते.