मिनेसोटा : अमेरिकेतील मिनेसोटा येथील मोझेस गिब्सन याची उंची ५ फूट ५ इंच असूनही तो स्वत:ला बुटका समजत होता. आपल्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी उणीव आहे, असे त्याचे मत होते. त्यावर त्याने उपाय शोधला. त्याने आपल्या पायांवर दोन शस्त्रक्रिया करून उंची आणखी ५ इंचांनी वाढविली. या शस्त्रक्रियांसाठी त्याने १ कोटी ३५ लाख रुपये खर्च केले. मोझेस याने आपली उंची वाढविण्याचा ध्यासच घेतला होता. शस्त्रक्रिया करून घेण्याच्या निर्णयापूर्वी त्याने हरप्रकारचे उपाय करून बघितले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याने विविध प्रकारची औषधे घेतली, पण कशानेही त्याला हवा तसा गुण येत नव्हता. अखेर त्याने शस्त्रक्रिया करून घेतली.
डेटिंग करतानाही यायची समस्याnमोझेस गिब्सनने सांगितले की, आजूबाजूला असलेली माणसे आपल्यापेक्षा उंच आहेत. मी त्यांच्यासारखा का नाही, असे सतत वाटत राहायचे.nया विचारांचा माझ्या लव्ह लाइफवरही परिणाम व्हायचा. मी कोणाबरोबर डेटिंगला गेलो की, त्या व्यक्तीसमोर स्वत:ला खुजा समजायचो. मी उंच आहे हे दाखविण्यासाठी उंच टाचेचे बूटही घालून पाहिले, पण त्यानेही फारसा फरक पडत नव्हता.
अशी केली पैशांची तरतूदमोझेस गिब्सन हा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर असून, तो उबेरचा चालक म्हणूनही काम करतो. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याने तीन वर्षांत ६१.४८ लाख रुपयांची बचत केली व २०१६ साली आपल्या दोन्ही पायांवर पहिली शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे त्याची उंची तीन इंचांनी वाढली. त्यानंतर, तो ५ फूट ८ इंच इतका उंच झाला होता, तरीही तो समाधानी नव्हता. मार्च महिन्यात मोझेसने ८०.३४ लाख रुपये खर्च करून दुसरी शस्त्रक्रिया करून घेतली.