अननस (Pineapple) व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि मॅंगनीज आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचे एक समृद्ध स्रोत मानले जाते. विशेषत: हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. पण, तुम्हाला जगातील सर्वात महागडे अननस माहीत आहे का? या अननसाची किंमत जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, हेलिगन अननस (Heligan pineapple) असे या महागड्या अननसाचे नाव आहे. हे नाव त्या बागेवरून ठेवले आहे, जिथे ते इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये उगवले जाते. एका अननसाची किंमत जवळपास 1,000 पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) आहे. या अननसाचे एक पीक तयार होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात.
एका वेबसाइटने दिलेल्यानुसार, हे अननस 1819 मध्ये ब्रिटनमध्ये आणले होते. त्यावेळी लवकरच बागायतदारांच्या लक्षात आले की, देशातील हवामान अननस लागवडीसाठी चांगले नाही. त्यामुळे येथील बागायतदारांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी विशेष लाकडी खड्ड्याच्या आकाराची भांडी तयार करून आणि अननसच्या पीकांना पोषण देण्यासाठी कुजलेल्या खताचा नवीन पुरवठा आणि एक बॅकअप हीटर जोडले. या उष्णतेमुळे हवा गरम होते, जी भिंतीतील छिद्रांद्वारे खड्ड्यांमध्ये प्रवेश करते.
रिपोर्टनुसार, हेलिगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, "अननसाचे उत्पादन घेण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अननसाची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ, खताचा वाहतूक खर्च, अननसाचे खड्डे आणि इतर लहान तुकड्यांची देखभाल करावी लागते. प्रत्येक अननस आम्हाला 1,000 पाउंड किंमतीला पडतो आहे."
10 लाखांपर्यंत जाऊ शकते किंमतहेलिगन वेबसाइटनुसार, राणी एलिझाबेथ द्वितीय यांना व्हिक्टोरियन ग्रीनहाऊसमध्ये उगवलेले दुसरे अननस भेट देण्यात आले होते. तसेच, उद्यान अधिकाऱ्यांनी सांगितले की, अननसाचा लिलाव झाल्यास प्रत्येक अननसाची किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते.