पैसे कमवण्यासाठी प्रत्येक जण खूप मेहनत करतात. दिवस-रात्र कष्ट करत असतात. प्रत्येकालाच चांगल्या पगाराची नोकर हवी असते. नोकरीसोबतच अनेक सोयीसुविधा मिळाव्यात अशीही इच्छा असते. पण सर्वांनाच चांगला जॉब मिळतोच असं नाही. पण तुम्हाला जर कोणी घरबसल्या आरामात कार्टून शो पाहण्याची नोकरी ऑफर केली आणि त्यासाठी तब्बल पाच लाख रुपये मिळतील असं सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशाच एक ड्रिम जॉब असल्याची माहिती आता समोर आली आहे.
यूनायटेड किंगडमच्या नॉटिंघममध्ये राहणाऱ्या एलेक्जेंडर टाउनलेजवळही (Alexander Townley) अशीच एक नोकरी आहे. ज्याबद्दल ऐकून कोणीही हैराण होईल. जगभरात बर्गर किंवा पिझ्झा टेस्टर, मेट्रेस टेस्टर आणि हॉटेल रिव्ह्यूअरसारख्या अनेक खास नोकऱ्या आहेत, ज्या तुम्हाला कमी कामात जास्त पैसे मिळवून देतात. तरीही कोणतीही नोकरी तुमची हौस पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्हाला आराम मिळवून देण्यासाठी बनलेली नाही. मात्र, एलेक्जेंडर टाउनलेची नोकरी अतिशय खास आहे.
दरवर्षी £5,000 म्हणजेच 5 लाखांहून अधिक पैसे मिळतात
नॉटिंघममध्ये (Nottingham) राहणारा 26 वर्षीय एलेक्जेंडर टाउनलेला अशी नोकरी मिळाली आहे. तो आपला आवडता कार्टून शो The Simpsons तासंतास बघतो. सध्या तर त्याला आपला हा आवडता कार्टून शो पाहण्यासाठी दरवर्षी £5,000 म्हणजेच 5 लाखांहून अधिक पैसे मिळतात. हे नोकरीही रोजची नाही, तर त्याला काहीच दिवस काम करावं लागतं आणि आरामात कार्टून शो पाहण्यासाठी त्याला डोनटचे पॅकेटही पाठवले जातात. जेणेकरून त्याला काहीतरी खात आपली नोकरी पूर्ण करता येईल. त्याच्या भावाने त्याला या नोकरीबद्दल सांगितलं होतं आणि तो लगेचच यासाठी तयार झाला.
दिवसभरात तो 30 एपिसोड बघतो
एलेक्जेंडरला या कामात सगळे एपिसोड अगदी लक्ष देऊन पाहावे लागतात आणि याचं विश्लेषण करावं लागतं. यासाठी त्याला आपलं काम अतिशय गांभीर्याने करावं लागतं. तो एपिसोड बघताना आपल्या हातामध्ये नोट्स काढण्यासाठी वही आणि पेन घेऊन बसतो आणि एपिसोडच्या क्रेडिटपासून एडिटिंगपर्यंत सगळ्या गोष्टी चेक करतो. हे ऐकायला जरीही मजेशीर असलं तरी एलेक्जेंडरसाठी ही त्याची नोकरी आहे. याशिवाय तो एका कॅफेमध्ये सुपरवायजरची नोकरीही करतो. दिवसभरात तो 30 एपिसोड बघतो आणि तब्बल 717 एपिसोड्स पाहून त्याचं विश्लेषण करावं लागतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.