अॅपलचे मुख्य दिवंगत स्टीव जॉब्स यांच्या वेगवेगळ्या गोष्टींची आणि त्यांच्या मेहनतीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या वेगवेगळ्या गोष्टींमधील एक खास बाब म्हणजे त्यांची कारची नंबर प्लेट. स्टीव जॉब्स हे कधीच त्यांच्या कारला नंबर प्लेट लावत नव्हते. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, नंबर प्लेट नसतानाही त्यांना कुणी कसं पकडलं नाही? तर आज जाणून घेऊ की, त्यांना का ट्रॅफिक पोलिसांना दंड लावला नाही किंवा पकडलं नाही....
स्टीव यांची इच्छा होती की, त्यांना कुणीही ट्रॅक करता कामा नये, त्यामुळे ते नंबर प्लेट नसलेल्या कारचा वापर करत होते. स्टीव जॉब्स नेहमी नंबर प्लेट नसलेल्या कारचा वापर करत होते. ते कॅलिफोर्नियात राहत होते आणि त्यांच्याकडे Mercedes SL55 AMG कार होती.
या कारवर त्यांनी कधीच नंबर प्लेट लावली नाही. पण तरी सुद्धा त्यांना पोलिसांनी कधीच पकडलं नाही आणि ना कधी त्यांच्यावर कधी कायदा तोडल्याचा आरोप झाला. आता हे त्यांनी केलं कसं हे जाणून घेऊ....
जॉब्स यांना हा फायदा कॅलिफोर्नियाच्या परिवहन कायद्यातील लूप होलमुळे मिळत राहिला. आपल्या कामासोबतच स्टीव जॉब्स हे त्यांचं जीवनही खास पद्धतीने जगत होते. स्टीव जॉब्स हे कॅलिफोर्निया व्हेइकल लॉ मधील एका सामान्य चुकीचा सहजपणे वापर केला होता.
कॅलिफोर्निया व्हेइकल लॉ अंतर्गत कोणत्याही नवीन वाहनाला ६ महिन्यांपर्यंत नंबर प्लेट न लावता गाडी चालवण्याची परवानगी मिळते. याचाच फायदा जॉब्स यांनी घेतला होता. ते दर सहा महिन्यांनी त्यांची कार बदल होते. त्यामुळे त्यांना कधीच नंबर प्लेट वापरण्याची गरजच पडली नाही.
स्टीव जॉब्स असं का करत होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण असं होतं की, स्टीव जॉब्स यांना वाटत होतं की, त्यांना कुणीही ट्रॅक करू नये. त्यामुळे त्यांनी नंबर प्लेट नसलेल्या गाडीचा वापर केला.