पत्त्यांचा डाव हा अनेकांना आवडीचा टाइमपास असतो. जुगार म्हणून नाही तर लोक एक खेळ म्हणूनही पत्ते खेळतात. काही मित्र घरात बसून पत्ते खेळण्याचा आनंद घेतात. हा खेळ खेळताना डोकंही खूप चालवावं लागतं. पण पत्त्याबाबत एक अशी बाब आहे जी 90 टक्के लोकांना माहीत नसेल. यातील एक पत्त्यात रहस्य दडलंय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवरील r/opticalillusions नावाच्या ग्रुपवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. या ग्रुपवर ऑप्टिकल इल्यूजनसंबंधी फोटो शेअर केले जातात. नुकताच एक फोटो शेअर करण्यात आला. ज्याबाबत कदाचित तुम्हालाही माहीत नसेल.
हे कार्ड डायमंड 8 चं आहे. जर तुम्ही हे कार्ड बारकाईने बघाल तर मधे दिलेल्या डायमंडच्या रिकाम्या जागेत 8 नंबर बनलेला दिसेल. म्हणजे कार्डच्या रिकाम्या जागेत 8 ही संख्या बनवली आहे. हा नंबर बघण्यासाठी कार्डच्या मधे असलेल्या डायमंडकडे लक्ष देऊन बघा आणि गॅप्समध्ये तुम्हाला 8 नंबर दिसेल.
या पोस्टवर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, पहिल्यांदा पाहिल्यावर 8 नंबर डोळ्यांसमोर जातच नाहीये. एकाने लिहिलं की, बराच वेळ पाहिल्यानंतर समजलं की, डायमंड 8 नंबरचा साइन बनवत आहे.
आणखी एक रहस्य
तुम्हाला माहीत असेलच की, 52 पत्त्यांमध्ये चार राजे असतात. यातील 3 राजांना मिशी असते. पण चौथा राजा क्लीन शेव असतो. प्रश्न हा आहे की, 52 पत्त्यातील चौथ्या राजाला मिश्या का नसतात? कार्ड डिझाइन करणाऱ्याकडून काही चूक झाली? की यामागे काही कारण आहे?
ज्याला मिशी नाही त्या राजाचं नाव काय?
पत्त्यांमध्ये ज्या राजाच्या चित्रात मिशी नाही त्याच राजाचं नाव आहे King of Hearts. King of Hearts नावाने एक सिनेमाही आला होता. त्यातही राजाला मिश्या नव्हत्या. तो फार सुंदर आणि क्लीन शेव आहे. पण British newspaper The Guardian नुसार, सुरूवातीला या राजालाही मिश्या असायच्या. पण एकदा कार्ड रिडिझाइन केलं जात होतं तेव्हा डिझायनर त्याला मिश्या काढणं विसरला आणि तेव्हापासून किंग ऑफ हार्ट्स विना मिश्या असलेला राजा झाला.