बिहारच्या मुजफ्फरपूर जंक्शनवर नुकतीच एक अजब घटना समोर आली. इथे एक मेहुणी भाओजीच्या प्रेमात अशी काही वेडी झाली की, ती त्याच्यासोबत लग्नासाठी हट्ट धरून बसली. भाओजी आणि मेहुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा बघण्यासाठी जंक्शनवर लोकांची गर्दी जमा झाली होती. भाओजीच्या प्रेमात पडलेली मेहुणी पुन्हा पुन्हा हेच म्हणत होती की, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझा स्वीकार कर.
तेच भाओजीने लग्न करण्यास नकार दिला तर मेहुणीने भिंतीवर आपटून आपटून डोकं फोडून घेतलं. नंतर म्हणाली की, आता तरी भांगेत कुंकू भर. भाओजीने घाबरून आपल्या नातेवाईकांना फोनकरून याची माहिती दिली. पण प्रेमात वेडी झालेली मेहुणी काही ऐकायला तयार नव्हती. अशात स्थिती बघून लोकांनी जीआरपीला सूचना दिली. दरम्यान तरूणी आणि तरूणाचे नातेवाईक तिथे पोहोचले. पोलीस येण्याआधी दोघांनाही तिथून नेण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तरूण राहुल कुमार सीतामढीचा राहणारा आहे. त्याचं दोन वर्षाआधी परिसरातीलच पिंकीसोबत लग्न झालं होतं. त्यांना एक लहान मुलगाही आहे. तेच पत्नीची 17 वर्षीय चुलत बहीण भाओजीसोबत गंमत करत होती. अशात ती भाओजीच्या प्रेमात पडली. त्यानंतर ती चांगलीच त्याच्या मागे लागली. ज्यामुळे तरूणाने सासरी जाणंही कमी केलं. जेव्हा तरूण बाहेरगावी जाण्यासाठी स्टेशनवर गेला तेव्हा मेहुणीही त्याच्या मागे गेली आणि त्याच्याकडे लग्नासाठी हट्ट करू लागली.
तरूणाने लग्न करण्यास नकार दिला तर तरूणाने भिंतीवर डोकं फोडून घेतलं. तिच्या डोक्यातून रक्त येत होतं. तेव्हा ती म्हणाली की, आता तरी माझ्या भांगेत कुंकू लाव, नाही तर मी जीव देईन. अशात नातेवाईक तिथे पोहोचले आणि दोघांनाही आपल्या सोबत घेऊन गेले.