Himalayas : संयुक्त अरब अमीरातचा एक अंतराळवीर सुल्तान अल नेयादी सध्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर सहा महिन्यांसाठी एका मिशनवर आहे. ते इथून घेतले जाणारे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करत आहेत. त्यांनी सांगितलं की, अंतराळात हिमालय असा दिसतो. त्यानी हिमालयाचे दोन फोटो शेअर केले आहेत जे अंतराळातून घेण्यात आले आहेत.
एक्स म्हणजे आधीच्या ट्विरवर शेअर करण्यात आलेले हे फोटो लोक शेअर करत आहेत. आपल्या ट्विट कॅप्शनमध्ये अल नेयादी यानी लिहिलं की, अंतराळातून हिमालय. एव्हरेस्ट समिटचं घर, पृथ्वीवर समुद्र तळापासून सगळ्यात उंचीवरील स्थान'.
फोटोंमध्ये हिमालय वरून कसा दिसतो हे तुम्ही बघू शकता. ज्यात ढगंही दिसत आहेत. हा नजारा अल नेयादीसाठी अर्थात आश्चर्यजनक असू शकतो, पण याआधीही अनेक अंतराळवीरांनी असे फोटो काढले आहेत.
याआधी अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचे अंतराळवीर जोश कसादा यांनी ऑरोरा बोरियालिस यांनी फोटो शेअर केले होते. ज्यात पृथ्वीचा एक खास नजारा बघायला मिळाला होता. अल नेयादी यांच्याबाबत सांगायचं तर त्यांच्या हिमालयच्या पोस्टला 69 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. 1100 पेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट लाइक केली आहे.