Mysterious Cave Of Mir Qasim: जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत जी हजारो वर्षांपासून रहस्य बनून आहेत. ज्यांचं रहस्य कुणीही उलगडू शकलं नाही. ही ठिकाणं नेहमीच चर्चेचा विषय बनलेली असतात. लोकांना अशा ठिकाणांबाबत फार आकर्षण असतं. लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. यात जंगल, किल्ले, डोंगर, भुयार, महाल यांचा समावेश असतो. यातील एका गुहेबाबत आपण आज जाणून घेणार आहोत जी अनेक वर्षांपासून रहस्य बनून आहे.
ही गुहा बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात श्री कृष्ण वाटिकेमध्ये आहे. ही गुहा 1760 ते 1763 पर्यंत बंगालचे नवाब मीर कासिम यांची गुहा आहे. मीर कासिम यांनी ही गुहा 250 वर्षाआधी बनवली होती. त्यांना राज्यात सुधारणा करायची होती. ज्यासाठी त्यांनी ही गुहा तयार केली. त्यानंतर आपली राजधानी मुर्शिदाबादहून मुंगेर (बिहार) ला आणली.
त्यावेळी मीर कासिम यांच्या राज्यावर ब्रिटिश सैनिक नेहमी हल्ला करत होते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी त्यांनी ही गुहा तयार केली होती. गुहेचं निर्माण कार्य 1760 मध्ये पूर्ण झालं होतं. या गुहेबाबत सांगितलं जातं की, याच्या आत जाण्याचा मार्ग आहे, पण बाहेर येण्याच्या मार्गाबाबत काही माहीत नाही. असा अंदाज लावला जातो की, या गुहेतून बाहेर पडण्याचा मार्ग मुफस्सिल जिल्ह्यातील पीर डोंगराजवळ आहे.
मीर कासिम यांची ही गुहा तयार झाल्यामुळे इंग्रज खूप नाजार होते आणि त्यामुळे त्यांनी मीर कासिमवर हल्ला केला होता. या हल्ल्यातून वाचण्यासाठी अवधचा नवाब शुजा-उद-दौलाने मीर कासिमचं समर्थन केलं. पण तो ब्रिटिश सैनिकांकडून पराभूत झाला. आणि 8 मे 1777 त्याचा मृत्यू झाला.
राजकुमार बहार आणि मीर कासिमची मुलगी राजकुमारी गुल हिची कबर याच गुहेत आहे. जी याच रस्त्याने पळून जात असताना ब्रिटिश सैनिकांकडून मारली गेली होती. गुहेच एक पार्कही आहे. पण बाहेर निघण्याचा मार्ग आजही रहस्य बनून आहे.