न्युयॉर्क : न्यू यॉर्कसिटीमध्ये अनेक कूटुंब बेघर आहेत. बेघर लोकांची दयनीय अवस्था अनेक माध्यमातून जगासमोर येत असते. न्यु यॉर्कमधील अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका बेघर व्यक्तीने आसऱ्यासाठी चक्क ट्रेनमधल्या सीटखाली असलेल्या जागेचा आसरा घेतला. त्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एकाही प्रवासाला याविषयी माहिती नव्हती. त्यामुळे त्याच्या 'घरावर' बसून कित्येकांनी प्रवास केला. न्यू यॉर्क सिटीच्या रेल्वे मार्गावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे न्यू यॉर्कमध्ये किती मोठ्या प्रमाणात बेघरांची अवस्था आहे, याचं प्रत्यक्ष दर्शन होत असल्याच्या प्रतिक्रिया तेथील प्रवाशांनी दिल्या आहेत. हा फोटो दि न्यू यॉर्क पोस्ट या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून अशाप्रकारे रेल्वेच्या सीटखाली आसरा शोधणे म्हणजे आश्चर्यच असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
न्यू यॉर्कच्या रेल्वे प्रशासनाने कोणत्याच प्रकारचे नियम केले नसल्याने लोकांनी रेल्वेलाच आपला आसरा समजला आहे. जर रेल्वे प्रशासाने वेळीच हस्तक्षेप केला नाही तर प्रवशांपेक्षा रेल्वेचे रहिवासीच जास्त येथे आढळतील, अशी प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. गेल्या काही वर्षात न्यू यॉर्कमध्ये बेघरांची संख्या फार वाढली आहे. न्यू यॉर्कच्या म्युनिसिपल शेल्टरमध्ये ऑगस्ट २०१७ च्या आकडेवारीनुसार १५ हजार ३१५ कुटुंब, २२ हजार ९७० बालके बेघर म्हणून राहतात. एवढंच नव्हे तर तब्बल १ लाख बेघर विद्यार्थीही येथे वास्तव्यास आहेत.फोटो सौजन्य - www.dailymail.co.uk