Airplane Story Trending on social media: देशात दररोज अनेक नवनवीन आणि विचित्र गोष्टी पाहायला, वाचायला आणि ऐकायला मिळतात. त्यातील काही गोष्टी कधी कधी आपल्याही मनात येऊन गेलेल्या असतात. पण काही गोष्टी आपल्या समजल्यावर समजतं की त्या आपल्या कल्पनेच्याही पलिकडल्या असतात. असेच एक धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. हा किस्सा ऐकून तुमच्या मनात एकाच वेळी अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतील हे नक्की. 'डेली मेल'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ५८ वर्षीय ली सेमेन्स्की यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मुलाने अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी विमान भाड्याने घेण्याचे ठरवले. मात्र, हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील अतिशय विचित्र निर्णय ठरला. त्याने विमानाने जाण्याचा निर्णय तर घेतला, पण त्यानंतर जे काही घडलं, त्याचं त्याने स्वप्नातही विचार केला नसेल.
नक्की काय घडलं..??
भाड्याने घेतलेल्या विमानातील एक खासियत (USP) म्हणजे या विमानात पाण्यात आणि हवेत दोन्ही ठिकाणी उडण्याची क्षमता होती. मात्र या विमानाचा अखेर अपघात झाला. ६१ वर्षीय पायलट जॉन्सन हे विमान उडवत होते. अपघातापूर्वी मुलाने वडिलांच्या अस्थिकलशाचे विसर्जन केले होते. पण या विमान अपघातात पायलटसह वडिलांच्या अस्थिकलशाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या मुलाचाही मृत्यू झाला. वैमानिकाशी संपर्क होऊ न शकल्याचे विमान वाहतूक विभागाने पोलिसांना कळवले. या अपघातानंतर तपास अधिकाऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत होते. या दरम्यान तपासात, लँडिंगपूर्वीच हे विमान क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे.
विमानाबाबत 'ही' होती सर्वात धक्कादायक बाब
तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी हे विमान घरगुती असल्याचे सांगितले. मात्र, अपघाताची नेमकी कारणे शोधण्यासाठी अद्याप तपास सुरू आहे. अनुभवी पायलट असूनही अशाप्रकारचा अपघात कसा घडला, याबद्दल अनेक सोशल मीडिया युजर्सना धक्का बसला असून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.