साप एक असा जीव आहे ज्याला जवळपास जगभरातील लोक घाबरतात. साप विषारी असो वा नसो त्याला बघितल्यावर भीती वाटतेच. अमेरिकेच्या (America) मेरिलॅंडमध्ये ((Maryland, America) राहणाऱ्या एका व्यक्तीला गेल्या महिन्यात त्याच्या घरात एक साप फिरताना दिसला होता. या सापाला मारण्यासाठी त्याने जे केलं त्याचा पश्चाताप आता त्याला आयुष्यभर राहणार. व्यक्तीने सापाला मारण्यासाठी घरातील शेकोटीतील कोळसा उचलला होता. पण या कोळशाने सापाचं काही नुकसान झालं की नाही हे तर समजू शकलं नाही, पण या व्यक्ती संपूर्ण घर जळून राख झालं.
ही घटना २३ नोव्हेंबरची रात्री १० वाजता दरम्यानची आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घराची आग विझवण्यासाठी साधारण ७५ फायर फायटर्स पाठवले होते. मोठ्या प्रयत्नांनंतर घराच्या आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. पण तोपर्यंत घर जळून राख झालं होतं. फायर फायटरचे स्पोकपर्सन पीट पिरिंगेर म्हणाले की, व्यक्तीने घरात दिसलेल्या सापाला जळता कोळसा फेकून मारला होता. पण कोळसा सापाला लागण्याऐवजी घरात आग लागली.
पीटने या घटनेचे काही फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिलं की, आगीचं कारण अपघात होतं. मालकाने सापाला कोळसा फेकून मारला होता. पण पेटत्या कोळशाच्या तुकड्याने घरात आग लागली. आगीमुळे व्यक्तीला साडे सात कोटी रूपयांचं नुकसान झालं. घराचा बराच भाग जळून राख झाला. सर्वात मोठी बाब म्हणजे या घटनेत नुकसान तर मोठं झालं, पण सापाचं काय झालं हे काही समजू शकलं नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, आग बेसमेंटपासून सुरू झाली होती. त्यानंतर आग हळूहळू पूर्ण घरात पसरली. घराचा जास्तीत जास्त भाग जळून राख झाला आहे. यात साधारण साडे सात कोटी रूपयांचं नुकसान झालं आहे. सोशल मीडियावर जळत्या घराचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात घरात लागलेली आग स्पष्टपणे दिसत आहे.