हॉंगकॉंगमध्ये काही चोरांनी एका ९० वर्षीय महिलेल ३२ मिलियन डॉलर्स म्हणजे २४० कोटी रूपयांचा चूना लावलाय. हा हॉंगकॉंगच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कॅम मानला जात आहे. ही महिला हॉंगकॉंगच्या श्रीमंत व्यक्तींमध्ये गणली जाते. साउथ पोलिसांनी याप्रकरणी एका १९ वर्षीय युनिव्हर्सिटी विद्यार्थ्याला अटक केली आहे. फोन स्कॅमर्सच्या एका अकाउंटमधून ८ कोटी रूपये जप्त करण्यात आल आहेत. मात्र, फोन स्कॅमर्सनी बाकीचे पैसे फस्त केले आहेत.
पोलिसांनुसार, या महिलेला एक फोन आला होता आणि एका व्यक्तीने तिला तो सरकारी अधिकारी असल्याचे सांगितले होते. पोलिसांकडून सांगण्यात आले की, महिलेला सांगण्यात आले होते की, त्यांच्या आयडेंटिटीचा वापर काही खतरनाक लोक करत आहेत आणि त्यामुळे त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
त्यानंतर त्यांनी महिलेला पैसे ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला जेणेकरून हे तपासता यावं की, त्यांचा पैसा बेकायदेशीर तर नाही ना. महिलेला सांगण्यात आले होते की, चीनमधील एक गंभीर क्रिमिनल केसमध्ये त्यांच्या पैशांचा वापर केला जात आहे. ही ऐकल्यानंतर महिला चांगलीच घाबरली. (हे पण वाचा : भारतातील सर्वात हुशार चोर ज्याने जज बनून लावला अनेक केसेसचा निकाल, ९५ वेळा झाली आहे अटक!)
महिलेला सांगण्यात आले होते की, काळजी करण्याची गरज नाही आणि त्यांचा सगळा पैसा चौकशीनंतर परत पाठवला जाईल. पण जेव्हा असं झालं नाही तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी लगेच पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनुसार, काही दिवसांआधी प्लंकेट रोडवरील या महिलेच्या घरी एक विद्यार्थी आला होता.
पोलिसांनुसार, या विद्यार्थ्याने महिलेला कम्युनिकेट करण्यासाठी फोनही दिला होता. याच नंबरवर फोन स्कॅमरने या महिलेला फोन केला होता. या महिलेने त्यानंतर २३९ कोटी रूपये तीन अकाउंटमध्ये जमा केले होते. महिलेने यासाठी आपल्या अकाउंटमधून ५ महिन्यात ११ वेळा ट्रान्झॅक्शन केले होते या महिलेला जेव्हा जाणीव झाली की तिची फसवणूक केली आहे तर तिने पोलिसांना सांगितले. पोलीस आता या केसची चौकशी करत आहे.