समुद्रात असे अनेक विशाल जीव राहतात जे अजूनही जगासमोर आले नाहीत. तर काही असे जीव आहेत जे क्वचितच निदर्शनास पडतात. हा समुद्र विशाल मनुष्यांसोबतच वेगवेगळ्या जीवांचंही पोट भरतो. समुद्रातील कितीतरी जीव आजही संशोधकांना मिळालेले नाहीत. पण जेव्हाही असे दुर्मिळ जीव समोर येतात तेव्हा समुद्राच्या खोलीची जाणीव होते. नुकताच कॅलिफोर्नियातील यूसी सांता बारबराच्या अमेरिकन रिव्हिएराच्या किनाऱ्यावर एक दुर्मिळ जीव आढळला. ज्याला बघून लोक हैराण झाले.
७ फूट लांब हा जीव एक मासा आहे. परीक्षणानंतर अभ्यासकांना आढळलं की, हा मासा 'हुडविंकर सनफिश' आहे. हा फार दुर्मिळ समुद्री जीव आहे. हा जीव याआधी २०१४ मध्ये आढळला होता. त्यानंतर दोन वर्षांआधी ही जीव न्यूझीलॅंडमध्येही आढळला होता.
जवळपास २ किलो वजनाच्या या माशाचं नाव हुडविंकर ठेवण्यात आलं कारण हा मासा स्वत:ला लपवण्यात तरबेज असतो. रिपोर्ट्सनुसार, संशोधकांसाठी हा मोठा प्रश्न आहे की, हा मासा त्याचं घर सोडून जमिनीवर कसा आला? कारण समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचण्यासाठी या माशाला १२ हजार किलोमीटरचा प्रवास करावा लागला.