शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

या लालभडक ओठांमध्ये दडलंय एक रहस्य, बघितल्यावर वाटतं लिपस्टिक लावलेले ओठ पण आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 4:10 PM

सेल्फी घेताना पाऊट करणाऱ्या म्हणजेच ओठांचा चंबू करणाऱ्या तरुणी तुम्ही पाहिल्या असतील.मात्र, वरील फोटो मध्ये दिसणारे ओठ कोणा मुलीचे नाहीत तर ते चक्क एका झाडाचं फूल आहे. बसला ना धक्का?

सेल्फी घेताना पाऊट करणाऱ्या म्हणजेच ओठांचा चंबू करणाऱ्या तरुणी तुम्ही पाहिल्या असतील. लिपस्टिक लावुन केलेलं ते पाऊट पाहुन अनेकांना त्या ओठांचा हेवा वाटतो. पण समजा असं पाऊट कोणत्या फुलाने केलं तर. वरील फोटो मध्ये दिसणारे ओठ  कोणा मुलीचे नाहीत तर ते चक्क एका झाडाचं फूल आहे. बसला ना धक्का?

या फुलाचं नाव सायकोट्रिया (Psychotria flower) आहे. तसेच या फुलाचं झाड ‘हॉट लिप्स प्लांट’ (Hot lips plant) किंवा ‘हुकर लिप्स’ (Hooker lips plant) या नावानेही ओळखलं जात. या फुलझाडाची उंची कमी असून याची पाने गडद हिरव्या रंगाची असतात. ही फुलं एखाद्या मुलीचनं लाल भडक लिपस्टिक लावलेल्या ओठांप्रमाणे दिसतात. या फुलांच्या या लालचुटुक पाकळ्या फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी अशा प्रकारच्या असतात. ‘व्हॅलेंटाइन डे’ला या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

या झाडाचे औषधी फायदे आहेत. या झाडामध्ये डायमिथाइल ट्रिप्टामाइन हे रसायन असतं. त्याचा वापर गाठी, वंध्यत्व आणि नपुंसकता यावरील उपचारांमध्ये केला जातो. कित्येक जण याचा वापर इतर आजारांवरही उपचारासाठी पारंपारिक औषध म्हणूनही करतात.

हे फूल उष्णकटिबंधीय भागामध्ये आढळतं. या फुलांची झाडं अत्यंत दुर्मिळ आहेत. हे झाड मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबिया, इक्वेडोर, कोस्टा रिका आणि पनामा यांसारख्या भागांमध्ये आढळून येते. या फुलांच्या साधारणपणे दोन हजारांहून अधिक प्रजाती आढळून येतात. दुर्दैवाने, मोठ्या प्रमाणात होत झाडांची कत्तल आणि पर्यावरणातील बदलामुळे ही प्रजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  तसेच जंगलात लागणारे वणवे, ग्लोबल वॉर्मिंग यामुळे याचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेenvironmentपर्यावरण