(Image Credit : straitstimes.com) (प्रातिनिधिक छायाचित्र)
काही सिनेमांमध्ये आपण पाहिलं होतं की, कशी नवजात बाळांची अदला-बदली केली जाते किंवा होते. तसंच जर एकाच नावाचे दोन रूग्ण एकाच हॉस्पिटलमध्ये आणि त्यांचं वयही एकसारखं असेल, आणि यात डॉक्टरांमध्ये कन्फ्युजन होऊन घोळ झाला तर? किंवा अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, ऑपरेशन करताना डॉक्टर कात्रीच पोटात विसरले. आता या सगळ्या गोंधळांहूनही वेगळा गोंधळ समोर आला आहे.
अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये एक धक्कादायक घडली आहे. झालं असं की, डॉक्टरांनी चुकून एका व्यक्तीची किडनी दुसऱ्याच व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट केली.
Loudres Hospital मधील ही घटना आहे. ५१ वर्षीय एका व्यक्तीची यशस्वीपणे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली. तर त्याच वेळेला त्याच नावाच्या एका दुसऱ्या व्यक्तीची देखील किडनी ट्रान्सप्लांट करायची होती. यातच डॉक्टरांमध्ये गोंधळ झाला.
म्हणजे ज्या व्यक्तीला अर्जंट किडनी ट्रान्सप्लांटची गरज होती, त्याची किडनी दुसऱ्याच व्यक्तीमध्ये ट्रान्सप्लांट करण्यात आली. हा सगळा घोळ नावांच्या यादीतील एका चुकीमुळे झाला. ज्याबाबत हॉस्पिटलकडून माफी मागण्यात आली. सध्या दोन्ही रूग्णांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगण्यात आलं आहे.